(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘दशावतार’ सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. अखेर हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुचर्चित सिनेमाचा प्रिमिअर सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या प्रिमिअरला चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली, सिनेकलाकारांसोबतच राजकीय क्षेत्रातली मंडळी देखील या प्रिमिअर सोहळ्याला उपस्थित राहिले होत.या सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रिमिअरला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनीही हजेरी लावली होती.
आदित्य ठाकरेंनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या मातीतली गोष्ट आणि जागतिक दर्जाची चित्रभाषा ह्यांचा संगम असलेला, local to global चं सार्थ उदाहरण असलेला, ‘दशावतार’ हा भव्य सिनेमा आजपासून सिनेमागृहात येतोय. प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन हा अनुभव घ्यायला हवा. ‘दशावतार’ च्या टिमला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा! असं आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आपल्या मातीतली गोष्ट आणि जागतिक दर्जाची चित्रभाषा ह्यांचा संगम असलेला, local to global चं सार्थ उदाहरण असलेला, 'दशावतार' हा भव्य सिनेमा आजपासून सिनेमागृहात येतोय. प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन हा अनुभव घ्यायला हवा.
'दशावतार' च्या टिमला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/8LZIxBFzsA— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 12, 2025
आदित्य ठाकरे यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक
चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना पाहाताच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. त्यांचा हा नम्रपणा पाहून नेटकऱ्यांनी आदित्य ठाकरेंच कौतुक केलंय.
आदित्य ठाकरेंची ही कृती सर्वांनाच भावली असून आता सोशल मिडीयावर या सोहळ्याचे फोटो व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
चित्रपटाची वैशिष्ट्ये
या चित्रपटात गावकुसवापासून देवभूमीपर्यंतचा प्रवास सुरु होणार असून परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावलेली एक खास कथा प्रेक्षकांना बघायळा मिळणार आहे.
‘दशावतार’ हा चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. कलेवर जीवापाड
प्रेम करणारा आणि कोकणच्या लाल मातीतील कलाकाराचा अवतार म्हणजे ‘दशावतार’.
संगीतही या सिनेमाचं वेगळं वैशिष्टय आहे. ए.व्ही. प्रफुल्लचंद यांच्या संगीतबध्द गाण्यांना गुरू ठाकूर यांची शब्दरचना लाभली आहे.
‘Love In Vietnam’ उतरला प्रेक्षकांच्या पसंतीस, चाहते म्हणाले ‘Gen Z साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट…’
लोकप्रिय कलाकारांचा भक्कम ताफा
सिनेमात दिग्गज तसंच युवा कलाकरांची फौज आहे. दिलीप प्रभावळकर हे सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
तसंच महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्याही खास भूमिका आहेत. तर तरुणाईत लोकप्रिय असलेले सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर हे कलाकार देखील आहेत.
तसंच विजय केंकरे, रवी काळे यांसारखे दिग्गज कलाकार या सिनेमात भूमिका साकारत आहेत.
विनोद तावडेंचीही हजेरी
या प्रिमिअर सोहळ्याला भाजप नेते विनोद तावडे देखील हजर होते. आदित्य ठाकरेंसह त्यांनी एकत्र फोटोही काढले.
दोघांमध्ये काही गप्पा झाल्याचंही व्हिडिओत दिसून येत आहे.