(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सिद्धार्थ-जान्हवीचा बहुप्रतिक्षित ‘परम सुंदरी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला, जो प्रेक्षकांना खूप आवडला. आता चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या एका दृश्यावरून वाद निर्माण झाला आहे. चित्रपटातून सिद्धार्थ-जान्हवीचा चर्चमधील रोमँटिक सीन काढून टाकण्याची मागणी होत आहे आणि असे न केल्यास ख्रिश्चन समुदायाने इशाराही दिला आहे. ख्रिश्चन समुदायाने या चित्रपटाच्या एका दृश्यावर निराशा व्यक्त केली आहे. तसेच आता चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणत्याही प्रतिक्रिया आलेल्या नाही आहेत.
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
चर्चमधील दाखवलेला सीन काढून टाकण्याची मागणी
‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक सीन दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर चर्चमध्ये रोमँटिक सीन करताना दिसत आहेत. या सीनच्या आधारे ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी निषेध केला आहे. वॉचडॉग फाउंडेशनने सीबीएफसी, मुंबई पोलिस, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून निर्मात्यांना चित्रपट आणि ट्रेलरमधून हे सीन काढून टाकण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की हे अधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी केले जात आहे.
निषेधाचा केला इशारा
तक्रारीत म्हटले आहे की चर्च हे एक पवित्र स्थान आहे आणि ते अश्लील कामासाठी व्यासपीठ म्हणून दाखवले जाऊ नये. ही दृश्ये धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचा अनादर करतात आणि ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावतात. तक्रार करताना, ख्रिश्चन समुदायाने इशारा दिला की जर निर्मात्यांनी चित्रपटातून ही सगळी दृश्य काढून टाकले नाही तर जनतेकडून या चित्रपट निषेध केला जाईल.
‘Saare Jahan Se Accha’ आहे सत्य घटनेवर आधारित? प्रतीक गांधी साकारणार मुख्य भूमिका
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
तुषार जलोटा दिग्दर्शित ‘परम सुंदरी’ २९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्सने हा चित्रपट निर्मित केला आहे. ‘परम सुंदरी’ची प्रदर्शन तारीख यापूर्वी दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट प्रथम एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता. त्यानंतर त्याची प्रदर्शन तारीख २५ जुलै निश्चित करण्यात आली होती, परंतु नंतर ती २९ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता हा चित्रपट अखेर २९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.