(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘दशावतार’ या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा अखेर सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दशावतार या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळात आहे. “दशावतार” या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगलं चर्चेत आहे! सुबोध खानोलकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत.
देवों के देव महादेव’ फेम सोनारिका भदोरिया होणार आई; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केले फोटोशूट
एकाच वेळी अनेक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला असून, प्रभावळकरांच्या अभिनयाने त्याला चार चाँद लावले आहेत. चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासूनच दशावतार च्या शोचे थिएटर हाऊसफूल होत असल्याचं दिसत आहे. सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
सॅकनिल्क’च्या आकड्यांनुसार दशावतार सिनेमानं पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड तब्बल ६५ लाखांची कमाई केली होती. तर भारतात सिनेमानं ५८ लाखांचा गल्ला पहिल्या दिवशी जमवला होता. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार ‘दशावतार’ने दुसऱ्या दिवशी तब्बल १.३९ कोटींची कमाई केली आहे. तर दोनच दिवसांत या सिनेमाने १.९७ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता रविवारी हा सिनेमा कितींची कमाई करेल, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
‘साऊथचे स्टार बॉलिवूडच्या अभिनेत्यांपेक्षा”… सयाजी शिंदेंच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा
दशावतार चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई
सॅकनिल्क’च्या आकड्यांनुसार दशावतार सिनेमानं पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड तब्बल ६५ लाखांची कमाई केली आहे. तर भारतात सिनेमानं ५८ लाखांचा गल्ला जमवला आहे.
चित्रपटाची दुसऱ्या दिवशी किती कमाई?
सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार ‘दशावतार’ने दुसऱ्या दिवशी तब्बल १.३९ कोटींची कमाई केली आहे. तर दोनच दिवसांत या सिनेमाने १.९७ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता रविवारी हा सिनेमा कितींची कमाई करेल, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
दशावतार चित्रपटातील कलाकार
‘दशावतार’ सिनेमात दिलीप प्रभावळकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, रवी काळे, सुनील तावडे, आरती वाबगावकर, विजय केंकरे यांच्या मुख्य भूमिका सिनेमात आहेत.