(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
देवों के देव महादेव मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली सोनारिका भदोरियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीने बेबी बम्प फ्लॉन्ट करत फोटोशूट केले आहे. सोनारिका आणि विकास या जोडप्याने त्यांच्या बेबीमूनच्या छायाचित्रांसह सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली, ज्यामध्ये सोनारिका तिच्या बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. त्यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनी त्यांनी ही आनंदाची बातमी दिली.
अभिनेत्री सोनारिका भदोरिया त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. फोटोंमध्ये, सोनारिका पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये समुद्रकिनाऱ्यावर तिच्या बेबी बम्पला फ्लॉन्ट करताना दिसत आहे.या जोडप्याने फोटोंना कॅप्शन दिले आहे, “आमचे सर्वात मोठे साहस अशी पोस्ट करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. सोनारिकाने शेअर केलेल्या फोटोवर अनेक चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षावर केला आहे. अभिनेत्री आरती सिंगनेही पोस्टवर एक कमेंट टाकली आणि लिहिले, “बेबीय्य
‘साऊथचे स्टार बॉलिवूडच्या अभिनेत्यांपेक्षा”… सयाजी शिंदेंच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा
लग्नानंतर सोनारिका भदोरिया आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त होती आणि ती छोट्या पडद्यापासून काही काळ दूर होती.
सोनारिकाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०११ मध्ये ‘तू दे ना साथ मेरा’ या मालिकेमधून केली होती. मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती ‘देवों के देव…महादेव’ या मालिकेमधील देवी पार्वतीच्या भूमिकेमुळे.
कोण आहे हा १५ वर्षांचा गायक ? ज्याच्या प्रतिभेने सलमान खानला केले प्रभावित
तिच्या सौम्य व्यक्तिमत्त्वाने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि ती प्रत्येक घराघरात पोहोचली.सोनारिकाने ‘पृथ्वी वल्लभ’, ‘दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली’ आणि ‘इश्क में मरजावां’ यासारख्या मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची विविधता दाखवून दिली.