
हेमा मालिनीआधी या परम सुंदरीवर फिदा होते धर्मेंद्र, अनेक मैल चालून पाहायला जात होते चित्रपट; कोण आहे ती अभिनेत्री?
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती कालपासून स्थिर नसल्याची चर्चा होती. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती फार गंभीर आहे. अशातच आता चाहते त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी, जुन्या आठवणी जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत. असाच एक प्रसिद्ध प्रसंग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जो त्यांच्या प्रेमाची गाथा सांगतो. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लव्हस्टोरी तर अनेकांना ठाऊक आहे पण तुम्हाला माहिती आहे का? हेमा मालिनी आधी धर्मेंद्र आणखीन एका अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे झाले होते.
हिंदी चित्रपटसृष्टीत एक देखणा तरुण म्हणून धर्मेंद्र यांची ओळख होती, त्यांच्या अभिनयावर आणि रूपावर अनेक अभिनेत्र्या घायाळ होत्या पण त्यांना आपल्या रूपावर घायाळ करणारी ती अभिनेत्री त्याकाळची एक दिग्गज नायिका होती. धर्मेंद्रच्या कारकिर्दीत अनेक महिला त्यांच्यावर फिदा झाल्या पण त्यांचे हृदय एका परम सौंदर्यासाठी धडधडत होते. आता ही अभिनेत्री नक्की कोण आहे तर चला जाणून घेऊया.
या अभिनेत्रीवर घायाळ झाले धर्मेंद्र
धर्मेंद्रने स्वतः नायिकेवरील प्रेमाची कबुली दिली आणि कबूल केले की तिच्यामुळेच ते चित्रपट जगताकडे आकर्षित झाले. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिग्गज अभिनेत्री सुरैया होती, जिने तिच्या शानदार कारकिर्दीत असंख्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आणि असंख्य गाणी गायली. सुरैयाच्या पहिल्या पडद्यावरच्या अभिनयाने धर्मेंद्र मोहित झाले. त्यांनी १९४९ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा “दिल्लगी” हा चित्रपट तब्बल ४० वेळा पाहिला. धर्मेंद्रने कबूल केले की ते सुरैयाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत होते.
धर्मेंद्र सुरैयावर प्रेम करत होते, तर ती देव आनंदवर मोहित झाली होती. त्यांचे प्रेमसंबंध १९४८ ते १९५१ पर्यंत टिकले. त्यांनी पळून जाण्याचा विचारही केला होता, परंतु त्यांचे कुटुंबीय या प्रेमाच्या मार्गात आले. सुरैया यांनी पुन्हा लग्न केले नाही. तिने १९६३ मध्ये अभिनय जगतातून निवृत्ती घेतली. धर्मेंद्रप्रमाणेच सुरैयाचीही कारकीर्द यशस्वी झाली. तिने ७० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि ३३८ गाणी गायली. देव आनंदसोबतची तिची जोडी लोकप्रिय होती.
या अभिनेत्रीसोबतही जोडले गेले नाव
धर्मेंद्र यांचे नाव पुढे प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांच्यासोबतही जोडले गेले, परंतु अभिनेत्री हेमा मालिनीसोबतची त्यांची प्रेमकहाणी सर्वात जास्त चर्चेत ठरली. दोघांची पहिली भेट १९७० मध्ये आलेल्या “तुम हसीन मैं जवान” चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
प्रेमासाठी केले धर्मांतर…
धर्मेंद्र यांनी २१ ऑगस्ट १९७९ रोजी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर हिच्याशी घटस्फोट न घेता हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. या काळात त्यांचे नाव दिलावर खान आणि हेमाचे नाव आयेशा बी असे ठेवण्यात आले. तथापि, धर्मेंद्र यांनी नंतर २००४ मध्ये हे दावे नाकारले आणि सांगितले की हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत.