(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लोकप्रिय गायक दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या दिल-लुमिनाटी टूर साठी चर्चेत आहे. दिलजीतला जगभरातून प्रेम मिळत आहे. प्रत्येकजण कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. बऱ्याच वर्षांनंतर गायकाच्या कॉन्सर्टची एवढी क्रेझ पाहायला मिळत आहे. भारत असो किंवा परदेश, दिलजीत दोसांझची लोकप्रियता इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत खूप जास्त होत चाली आहे.
दिलजीत दोसांझ स्टेजवर घसरला
आता, दिलजीत दोसांझचा त्याच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुन्हा एकदा एका कॉन्सर्टदरम्यान त्याच्यासोबत मोठा अपघात झाला आहे. त्यानंतर गायक स्टेजवर वाईटरित्या पडताना दिसतो. खरंतर, दिलजीत दोसांझसोबत रविवारी अहमदाबादमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स देत असताना ही लाजिरवाणी घटना घडली. दिलजीत पूर्णपणे पंजाबी लूकमध्ये परफॉर्म करत होता. त्याची उर्जा पातळी खूप जास्त होती. चाहते देखील त्याला गाताना एन्जॉय करत होते.
रंगमंचावर तेल कसे आले?
दिलजीत गाणी म्हणत होता आणि प्रेक्षकांशी संवाद साधत होता आणि डान्स स्टेप्स देखील करत होता. या मल्टी टास्किंगमुळे दिलजीत दोसांझचा पाय स्टेजवर घसरला. आता अभिनेत्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तो कसा पडला? त्याच्या पडण्याचे कारण त्यानेच चाहत्यांना सांगितले. तसेच स्टेजवर पाय घसरताच गायक उठला आणि आयोजकांना म्हणाला, ‘तुम्ही हे फायर जोडता ते करू नका. मग त्याचे इथपर्यंत तेल येते.’ मात्र, या काळात दिलजीतला कोणतीही दुखापत झाली नाही आणि त्याने चाहत्यांना सांगितले की तो ठीक आहे आणि त्यानंतर त्याने पुन्हा परफॉर्म करण्यास सुरुवात केली.
Diljit Dosanjh fell during his Live concert in Ahmedabad! Bro fell at the right lyrics “Hor Kisi te Dul gaya”!!
byu/TheCalm_Wave inBollyBlindsNGossip
आर्यन खानलाही केले टार्गेट? शाहरुख खानला धमकी देणाऱ्या वकिलाचा मास्टर प्लॅन उघड!
यापूर्वीही रंगमंचावर पडण्याचा इतिहास
दिलजीत दोसांझ स्टेजवर अशा प्रकारे सर्वांसमोर पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. एकदा हनी सिंगसोबत परफॉर्म करताना तो असा पडला की आजपर्यंत लोक तो सीन विसरू शकले नाहीत. त्याचा तो व्हिडीओ आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि त्यादरम्यान त्याची खूप खिल्ली उडवली गेली. मात्र, यावेळी तो पडल्याने चाहत्यांना त्याची काळजी वाटू लागली. मात्र घाबरण्याची गरज नाही कारण गायक बरा असून लवकरच मुंबईत कार्यक्रम करणार आहे.