Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रतन टाटा यांना दिलजीत दोसांझने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये वाहिली श्रद्धांजली, प्रेक्षक झाले भावुक!

उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. जगभरातील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. पंजाबी गायक दिलजीत दोसांझने लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट थांबवून रतन टाटा यांच्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 10, 2024 | 11:38 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय उद्योगपती रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. रात्री उशिरा त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ही बातमी एकूण चाहत्यांना धक्का बसला आहे. रतन साहेबांनी अशा प्रकारे जगाचा निरोप घेणे कोणालाही आवडत नाही आणि त्यांच्या निधनाने सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. याचदरम्यान पंजाबी चित्रपट कलाकार आणि गायक दिलजीत दोसांझ यांना रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी त्यांची लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट मध्यंतरी थांबवली आणि त्यांना एका खास पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. रतनजींबद्दल दिलजीत काय म्हणाला जाणून घ्या.

दिलजीतने लाईव्ह कॉन्सर्ट थांबवला
सध्या दिलजीत दोसांझ जगभर त्याच्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट करत आहे. अलीकडेच, युनायटेड किंगडम म्हणजेच यूकेमध्ये परफॉर्म करणारा दिलजीत जर्मनीला पोहोचला आणि बुधवारी रात्री तिथे एक संगीत कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाची माहिती मिळाली आणि त्यांनी ताबडतोब त्यांची मैफल थांबवली आणि पद्मविभूषण उद्योगपतींना श्रद्धांजली वाहिली.

 

रतन टाटा यांच्याबद्दल दिलजीत काय म्हणाला?
रतन टाटा हे उद्योगपती असल्याबरोबरच एक सामान्य माणूस म्हणून सर्वांचे आवडते होते. त्यांचा साधेपणा लोकांच्या हृदयात कायम उच्च स्थान मिळवेल. त्यामुळेच दिलजीत दोझांस यांनीही रतन टाटा यांना त्यांच्या खास शैलीत श्रद्धांजली वाहिली आहे. वास्तविक, त्याच्या जर्मनीच्या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गायक असे म्हणताना दिसत आहे की, “आमचे प्रिय रतन टाटाजी यांचे निधन झाले आहे. हे जीवन आहे, त्यांनी ज्या प्रकारे आपले निर्दोष जीवन जगले ते कौतुकास पात्र आहे. त्यांनी आपल्याला कठोर परिश्रम करण्यास आणि आपल्या ध्येयांवर शांततेने लक्ष केंद्रित करण्यास शिकवले आहे. त्यांनी कधीही कोणाबद्दल चुकीचा शब्द बोलला नाही आणि चांगले काम केले. आजचा कार्यक्रम त्यांच्या नावावर आहे, तुम्हाला सलाम.” असे म्हणून गायकाने त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हे देखील वाचा- Ratan tata death live updates: ‘कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक…’; राज ठाकरेंनी रतन टाटा यांच्याबाबत व्यक्त केल्या भावना

अशाप्रकारे दिलजीत दोझांस यांनी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. यावरून दिलजीतला ते किती आवडायचे याचा अंदाज सहज लावता येतो. रतन साहेबांवर आज शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे. मुंबई पोलिसांकडून मानवंदना दिली जाणार आहे.

Web Title: Diljit dosanjh pay tribute for ratan tata in his live concert at germany details inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • Diljit Dosanjh
  • Diljit Dosanjh Concert
  • Ratan Tata

संबंधित बातम्या

दिलजीत डोसांझचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ची शूटिंग अखेर पूर्ण! लवकरच होणार प्रदर्शित
1

दिलजीत डोसांझचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ची शूटिंग अखेर पूर्ण! लवकरच होणार प्रदर्शित

‘Sardaar Ji 3’ वादानंतर पहिल्यांदाच मीडिया समोर आला दिलजीत, हात जोडून मानले आभार
2

‘Sardaar Ji 3’ वादानंतर पहिल्यांदाच मीडिया समोर आला दिलजीत, हात जोडून मानले आभार

‘No Entry 2’ मधून बाहेर होण्याच्या अफवांना दिलजीतने दिला पूर्णविराम, निर्मात्यांसोबत शेअर केला व्हिडीओ
3

‘No Entry 2’ मधून बाहेर होण्याच्या अफवांना दिलजीतने दिला पूर्णविराम, निर्मात्यांसोबत शेअर केला व्हिडीओ

नसीरुद्दीन शाह यांच्यावर अख्खी इंडस्ट्री संतापली, ज्येष्ठ अभिनेते नेमकं काय म्हणाले ?
4

नसीरुद्दीन शाह यांच्यावर अख्खी इंडस्ट्री संतापली, ज्येष्ठ अभिनेते नेमकं काय म्हणाले ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.