(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अनुराग कश्यपने बॉलिवूडमध्ये अनोखे आणि अप्रतिम हिट चित्रपट दिले आहेत. मात्र काही काळापासून त्याला बॉलिवूडमध्ये आपल्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळत नाहीये. यामुळेच अनुराग साऊथच्या चित्रपटांकडे वळला आहे, तो तिथल्या चित्रपटांमध्येही अभिनय करताना दिसतो आहे. एक अभिनेता म्हणून स्वतःचा शोध घेत आहे. अनुरागला साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव बॉलिवूडपेक्षा वेगळा होता. अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत चर्चा केली आहे. या मुलाखतीदरम्यान त्याने बॉलिवूडच्या स्टारबद्दलही बोलताना दिसला.
बॉलिवूडमधील चित्रपट निर्मितीचा उत्साह संपला आहे.
अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, बॉलीवूडमध्ये फक्त बिझनेस आणि मार्जिन बद्दल चर्चा होत आहेत. चित्रपटाची विक्री कशी होईल याचा आधी विचार केला जातो. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्याची मजाच संपते. यामुळेच अनुरागला आता मुंबई सोडून दक्षिणेत स्थायिक व्हायचे आहे. हे सगळं अभिनेता पुढच्यावर्षी म्हणजेच येणाऱ्या नव्या वर्षात करणार आहे. अनुरागच्या म्हणण्यानुसार, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोक चित्रपट बनवण्यात खूप उत्साही आहेत. असे त्यांनी सांगितले आहे.
अभिनेता उद्योगाला कंटाळा आहे?
ते पुढे मुलाखतीत म्हणाले की, तो बॉलिवूडला कंटाळला आहे आणि निराश झाला आहे. इथेही विचार करून थकलो आहे. साऊथच्या ‘मंजुम्मेल बॉयज’सारखा चित्रपट बॉलीवूडला बनवता आलेला नाही, असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. बॉलीवूड फक्त चित्रपटाचे रिमेक बनवत चाले आहेत, त्याला त्याच्या बाजूने काहीही नवीन तयार करायचे नाही.’ असे त्याने सांगितले. अभिनेत्याचा हा निर्णय चाहत्यांना थोडा नाराज करणारा आहे.
स्टार ट्रिटमेंटमुळेही समस्या
अनुराग कश्यपनेही बॉलीवूडमधील कलाकारांच्या वागणुकीबद्दल सांगितले आहे. हिंदी चित्रपटांतील प्रत्येक अभिनेत्याला स्टार ट्रिटमेंटची गरज असते, असे तो मुलाखतीत सांगतो. साऊथ इंडस्ट्रीत असे घडत नाही, तर मोठे कलाकारही चित्रपटातील इतरांप्रमाणेच वागतात.’ असे दिग्दर्शकाने सांगितले. दिग्दर्शक अनुराग कश्यपने अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपट केले आहेत. आणि ते प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत.