Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राधिका मदनला इरफान खानशी न बोलण्याचा झाला पश्चाताप? म्हणाली- ‘ते खूप काही सहन करत होते’

अक्षय कुमारसोबत 'सरफिरा' या चित्रपटासाठी कौतुकाचा वर्षाव होणारी अभिनेत्री राधिका मदन हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आंग्रेजी मीडियमशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिला इरफान खानशी न बोलल्याचा पश्चाताप होत आहे. आंग्रेजी मीडियम या चित्रपटानंतर त्याच्या काही योजना होत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 24, 2024 | 11:35 AM
Irrfan Khan (फोटो सौजन्य- X अकाउंट)

Irrfan Khan (फोटो सौजन्य- X अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

राधिका मदन ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे यात शंकाच नाही. ‘मेरी आशिकी तुम से ही’ या डेली सोपमधून प्रसिद्धी मिळवल्यानंतर राधिकाने फिल्मी दुनियेत आपला ठसा उमटवला आहे. तिने या मालिकेनंतर ‘पटाखा’, ‘मर्द को दर्द नहीं होता’ आणि ‘शिद्दत’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. आणि प्रेक्षकांची पसंती निर्माण केली. या चित्रपटानंतर तिला अनेक बॉलीवूड स्टार्ससोबत काम करण्याची संधी प्राप्त झाली.

2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाने राधिका मदनला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात ती इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. दिग्गज अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणे ही राधिकासाठी मोठी गोष्ट होती, पण तरीही तिला एका गोष्टीचा पश्चाताप होतो. एका मुलाखतीदरम्यान तिने या महान कलाकाराची आठवण काढून या चित्रपटाचा एक किस्सा शेअर करताना दिसली आहे. ज्यावेळी ती भावुक आणि दुःखी झाली.

राधिकाला आली ऑन-स्क्रीन इरफान खान यांची आठवण
राधिका मदानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिला ‘अंग्रेजी मीडियम’च्या सेटवर इरफान खानशी न बोलल्याबद्दल खेद वाटतो. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना राधिका म्हणाली, “मी नुकताच हा चित्रपट माझ्या मित्राला दाखवत होते कारण त्याने तो पाहिला नव्हता आणि मी असाच चित्रपट पुन्हा कधी करू शकेन का याचा विचार करत राहिले. मला इरफान सरांची खूप आठवण येत होती.” असे तिने या मुलाखतीत सांगितले.

हे देखील वाचा- कोविड-19 नंतर अक्षय कुमारने चित्रपट निवडण्याच्या पद्धतीत केले बदल, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय!

राधिका मदनला होतोय पश्चाताप
‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री राधिका मदन पूर्णपणे तिच्या व्यक्तिरेखेवर केंद्रित होती. शूटिंगनंतर कधीतरी इरफानशी बोलेल असं तिला वाटत होते. पण तसेच काहीच घडले नाही. राधिका म्हणाली, “मी विचार करत होते की मी त्यांच्यासोबत जास्त का बोली नाही आणि त्यांच्या मनातून गोष्टी का काढल्या नाहीत. मी सेटवर खूप शांत असायची आणि मी त्यांना त्यांचा एकटा वेळ देयीची. माझे पूर्ण लक्ष माझ्या व्यक्तिरेखावर केंद्रित होते. मला वाटले की या चित्रपटानंतर त्यांच्याकडे चित्रपट, अभिनय आणि क्राफ्ट यावर चर्चा करण्यासाठी भरपूर वेळ असेल, परंतु ते खूप काही सहन करत होते.’ असे तिने या मुलाखतीत सांगितले.

‘अंग्रेजी मीडियम’ रिलीज झाल्यानंतर दीड महिन्यातच इरफान खानचा कर्करोगाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. आणि या नंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी ‘अंग्रेजी मीडियम’ हा शेवटचा चित्रपट करून सगळ्यांचा कायम स्वरूपी निरोप घेतला. अजूनही चाहत्यांच त्यांच्यावर भरपूर प्रेम आहे. इरफान खानच्या चित्रपटावर, अभिनयावर आणि त्यांच्या कलाकौशल्यावर चाहते अजूनही यासाठी वेडे आहेत.

Web Title: Does radhika madan regret not talking to irrfan khan said they were suffering a lot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • Bollywood Film
  • Radhika Madan

संबंधित बातम्या

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया
1

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी
2

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाला मिळाली धमकी, मदतीसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल
3

चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाला मिळाली धमकी, मदतीसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल

पाकिस्तानी अभिनेत्याच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला भारतात हिरवा कंदील; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित!
4

पाकिस्तानी अभिनेत्याच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला भारतात हिरवा कंदील; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.