एकता आर कपूर आणि महावीर जैन एक कौटुंबिक कथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज आहेत जी प्रत्येक पिढीला मनोरंजन करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेला त्यांचा शीर्षकहीन प्रकल्प चर्चेत असताना सगळेच त्यासाठी उत्सुक आहेत. शशांक खेतान (बद्रीनाथ की दुल्हनिया आणि हम्प्टी शर्मा की दुल्हनिया) आणि मृघदीप सिंग लांबा (फुक्रे फ्रँचायझी) हे दोन प्रतिष्ठित चित्रपट निर्मात्यांसोबत सामील होत आहेत जे प्रेक्षकांना थिएटरमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं घेऊन येणार आहेत. हे या सगळ्यातून स्पष्ट होत आहे.
एकता कपूर आणि महावीर जैन यांनी सांगितले की, ते चित्रपटाच्या “हर जनरेशन कुछ कहता है” या शक्तिशाली संदेशाशी जोडले गेले आहेत आणि ही हृदयस्पर्शी कथा जगभरातील प्रेक्षकांसोबत शेअर करण्याची संधी स्वीकारली आहे.
प्रतिष्ठित चित्रपट निर्माती एकता आर कपूर आणि महावीर जैन एका परफेक्ट कौटुंबिक मनोरंजनासाठी एकत्र येत असल्याच समजले आहे. प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करून दोन पिढीतील अंतर भरून काढण्यासाठी यांचा नवा प्रोजेक्ट तयार होत आहे. एकता कपूरने या कौटुंबिक चित्रपटाच्या ट्रेलरचे थिएटरमध्ये नुकतच अनावरण केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाचा खास प्रीमियर झाला होता तेव्हा एकता कपूर आणि महावीर जैन यांनीही ‘चंदू चॅम्पियन’च्या निर्मात्यांना त्याच्या थिएटर रनसाठी शुभेच्छा दिल्या आहे. दोन्ही चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर जोडल्याबद्दल साजिद नाडियादवाला यांचे आभार मानले आहेत.
पूर्वी एकता आर कपूरने या चित्रपटाबद्दल तिचे मनापासून मत व्यक्त केले आणि याला तिचा हा चित्रपट तिच्या प्रकारातील आहे असे संगितले होते. तिने कुटुंबांमधील पिढीतील अंतराचे सुंदर चित्रण आणि एकत्र जीवन साजरे करण्याच्या प्रगल्भ दृष्टीकोनाची प्रशंसा या चित्रपटामध्ये दाखणव्यात येणार आहे असे ती म्हणाली आहे. हा चित्रपट यावर्षी ऑगस्टमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार असून या चित्रपटाचे शीर्षक अद्यापही समोर आले नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे यात शंकाच नाही.
निर्मात्या एकता कपूर आणि महावीर जैन या दोघांनीही बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहे. आता या दोघांचा येणार प्रोजेक्ट नाकी काय घेऊन येणार आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे. नक्कीच काही तरी धम्माल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हृदयस्पर्शी चित्रपट असे यात शंकाच नाही.