(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेता सोनू सूद आता चाहत्यांचा ‘नॅशनल हिरो’ बनला आहे. अनेक चाहते त्याला ‘गरीबांचा मसिहा’ आणि ‘रियल हिरो’ अशा टोपणनावांनी हाक मारतात. याचे कारण सर्वांनाच माहीत आहे. सोनू सूद मध्यरात्रीही गरजूंच्या मदतीसाठी उपस्थित राहतो. आता या अभिनेत्याचा ‘फतेह’ चित्रपट येत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. नुकतेच सोलापुरातील मुलांनी या चित्रपटातील अभिनेत्याच्या लूकचा भव्य कटआउट तयार केला आहे. जो सोशल मीडियावर आता प्रचंड व्हायरल होत आहे.
500 मुलांनी विक्रम केला
सोलापूरच्या मुलांनी नवा विश्वविक्रम केला आहे. सुमारे 500 मुलांनी मिळून सोनू सूदचा 410 फूट उंच कटआउट बनवला आहे. हा व्हिडीओ व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. अभिनेत्याचा जो कटआउट बनवला आहे तो त्याच्या आगामी ‘फतेह’ चित्रपटातील लुकचा आहे. तो हातात बंदूक घेतलेला दिसत आहे. हा कटआउट त्यांच्या चाहत्यांनी मिळून तयार केला आहे. ‘फतेह’ चित्रपटाच्या रिलीजआधीच अभिनेत्याच्या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येत आहे.
रजनीकांतच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ‘कुली’ चित्रपटाबाबत सामोरे आले रहस्य, जाणून होईल आनंद!
‘ॲनिमल’ चित्रपटाला टक्कर
‘फतेह’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दोन ट्रेलर रिलीज झाले असून दोन्ही ट्रेलर प्रेक्षणीय आहेत. सध्या ट्रेलर पाहता हा चित्रपट ॲक्शन आणि फायटिंगच्या बाबतीत रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’शी टक्कर देत असल्याचे दिसते आहे. तसेच या चित्रपमध्ये सोनू सूद डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. त्याला पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.
जॅकलिनसोबत जोडी जमणार
सोनू सूद या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या दुनियेत पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असून दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळत आहे. या चित्रपटात सोनू सूदसोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. सध्या सोनू सूद या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. तसेच या चित्रपटामध्ये बॉलीवूडमधील अनेक कलाकार काम करताना दिसणार आहेत.