फिर आयी हसीन दिलरुबा (फोटो सौजन्य-Instagram)
‘रांझना’, ‘तुंबाड’ आणि ‘न्यूटन’ सारख्या अभूतपूर्व चित्रपटांसह शैलीच्या सीमा तोडण्यासाठी प्रसिद्ध असलेले दूरदर्शी चित्रपट निर्माते आणि निर्माता आनंद एल राय पुन्हा एकदा चर्चेत येणार आहेत. त्याचा नवीन चित्रपट ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ प्रेक्षकांना त्याच्या प्रिय ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा दुसरा भाग पाहायला मिळणार आहे. या दुसऱ्या भागाची चाहत्यांनी आतुरतेने वाट पहिली असून, अखेर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2021 साली OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झालेल्या ‘हसीन दिलरुबा’ या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाच्या गुप्त कथेने लोकांची मने जिंकली होती. तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि हर्षवर्धन राणे स्टारर हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाची कथासुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा Netflix वर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तसेच आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी ते उत्सुक झाले आहेत.
‘हसीन दिलरुब’ या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर ‘हसीन दिलरुबा’ चा दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये टीझरसह या चित्रपटाचा दुसरा भाग जाहीर केला. हा छोटा टीझर असल्याने चाहते OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. आता अखेर या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. यावेळी विकी कौशलचा धाकटा भाऊ सनी कौशल हर्षवर्धन राणेच्या जागी चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना आनंद एल राय म्हणाले की, “फिर आयी हसीन दिलरुबा” ही आम्ही आतापर्यंत केलेली सर्वात विलक्षण कथा आहे. हा चित्रपटामध्ये मूळ कथानकापेक्षा काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, “मला नेहमीच अनोख्या आणि आकर्षक कथा जीवनात आणण्याची आवड आहे. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ ही निःसंशयपणे कलर यलोची आतापर्यंतची सर्वात वेगळी कथा आहे. नाटक, मसालेदार रोमान्स आणि वेधक नवीन पात्रे आणि कथानकांच्या मिश्रणासह हा सिक्वेल प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशा प्रतिभावान कलाकार आणि क्रू सोबत काम करणे हा एक आनंददायी प्रवास होता आणि प्रेक्षकांना थ्रिल आणि उत्साह अनुभवण्याची मी वाट पाहू शकत नाही.” असे त्यांनी सांगितले.
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती राय यांच्या प्रतिष्ठित बॅनर, कलर यलो प्रॉडक्शन्स अंतर्गत केली गेली आहे. ‘शुभ मंगल सावधान’, ‘मनमर्जियां’, ‘तुंबाड’ आणि ‘शुभ मंगल झ्यादा सावधान’ यांसारख्या अनेक समीक्षकांनी प्रशंसनीय आणि चाहत्यांच्या पसंतीच्या चित्रपटांना पाठिंबा देण्यासाठी ओळखले जाणारे प्रोडक्शन हाऊस नाविन्यपूर्ण कथाकथनाचे पॉवरहाऊस बनले आहे. याचदरम्यान आता ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या चित्रपटाची रोमांचित कथा आणि रोमान्स पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.