Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निकिता दत्ताचा अप्रतिम अभिनय तुम्ही कदाचित चुकवला असेल, तर टाका या चित्रपटांवर नजर

निकिता दत्ता ही निःसंशयपणे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. टेलिव्हिजनपासून बॉलीवूडपर्यंत आणि आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'घरत गणपती' मधून मराठी इंडस्ट्रीत देखील पदार्पण करताना दिसणार आहे. ही 'गोल्ड' गर्ल आपल्या कामाने आणि उत्कृष्ट अभिनयाने सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या अभिनेत्रीचे पाच अवश्य पहावे असे चित्रपट जाणून घेऊयात

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 09, 2024 | 05:29 PM
निकिता दत्ताचा अप्रतिम अभिनय तुम्ही कदाचित चुकवला असेल, तर टाका या चित्रपटांवर नजर
Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री निकिता दत्ता ही बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. निकिता अनेक हिंदी चित्रपटामध्ये तसेच टेलिव्हिजनमध्ये काम केले आहे. तिचा अभिनय आणि कौशल्य शैली पाहून प्रेक्षक तिला पसंत करतात. निकिता दत्ताचे आतापर्येंतच्या कारकिर्दीतील पाच चित्रपटावर टाका एक झलक जे चित्रपटगृहात ब्लॉग्ब्लास्टर झाले आहेत.

1) ‘गोल्ड’

निकिता दत्ताने अक्षय कुमार अभिनीत आणि रीमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला, ज्यामध्ये निकिताने देसी भारतीय मुलगी ‘सिमरन’ची भूमिका साकारली होती. तिच्या दिसण्यापासून ते बोलीभाषेपर्यंतच्या तिच्या मूळ व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक केले गेले होते.

२) कबीर सिंग

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी अभिनीत ‘कबीर सिंग’मध्ये निकिता दत्ताने जिया शर्माची भूमिका साकारली होती. या तीव्र प्रेमकथेतील तिच्या निर्णायक भूमिकेने लक्ष वेधून घेतले, ज्यामुळे ती या चित्रपटातील दुसरी उल्लेखनीय महिला लीड म्हणून प्रसिद्ध झाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या नजरा खुलवल्या होत्या.

३) ‘द बिग बुल’

अभिषेक बच्चन अभिनीत ‘द बिग बुल’ मध्ये, निकिताने अभिषेकला आवडत असलेल्या प्रेमाच्या पात्राची प्रिया पटेल शाहची भूमिका साकारली होती. एक आश्वासक चित्रपट मानल्या जाणाऱ्या चित्रपटात या चित्रपटाचादेखील समावेश आहे.

४) डायबबुक

इमरान हाश्मी आणि निकिता दत्ता अभिनीत सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर ‘डिब्बुक’ हा तिच्या कारकिर्दीतील आणखी एक उल्लेखनीय चित्रपट आहे. निकिताने माही इसाकची भूमिका या चित्रपटामध्ये साकारली होती, जिच्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही दाद मिळाली.

५) डांगे

‘डांगे’ या द्विभाषिक ॲक्शन ड्रामामध्ये निकिता दत्ताने तिच्या आधीच्या अभिनयापेक्षा खूपच वेगळी भूमिका साकारली होती. तिच्या आकर्षक चित्रणाने चित्रपटाला न्याय दिला, एक अभिनेत्री म्हणून तिची अष्टपैलुत्व या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली आहे.

अश्या प्रकारे अभिनेत्री निकिता दत्ताचे सर्व हिंदी चित्रपट पाहण्यासारखे आहेत, ज्यामध्ये तिचा अभिनय आणि कौशल्यचे दाद द्यावी असे वाटते. तसेच निकिता दत्ता आता लवकरच ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटामध्ये काम करताना दिसणारे आहे. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: From kabir singh to dange these nikita dutta five films became blockbusters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 05:21 PM

Topics:  

  • Nikita Dutta

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.