फोटो सौजन्य - सोशल मीडिया
‘RRR’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या अफाट यशानंतर सुपरस्टार राम चरण त्याचा आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’ घेऊन येत आहेत. हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित होणार असून त्यासाठी निर्मात्यांनी ॲडव्हान्स बुकिंग प्रक्रिया सुरू केले आहे. ७ जानेवारीपासून सुरू झालेल्या ॲडव्हान्स बुकिंगचा पहिल्या दिवसाचा अहवाल आता समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर ‘गेम चेंजर’ पहिल्या दिवशी चांगली कमाई करेल हे स्पष्ट होते. मात्र, या चित्रपटावर आणखी एक धोका निर्माण झाला आहे, तो म्हणजे ‘डाकू महाराज’ या चित्रपटाचा. हा चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्याची चर्चा आधीपासूनच सोशल मीडियावर दिसत आहे. जाणून घेऊयात ‘गेम चेंजर’चे ॲडव्हान्स बुकिंग किती झाले आहे.
गेम चेंजरची आगाऊ बुकिंग
अभिनेत्री कियारा अडवाणी ‘गेम चेंजर’मध्ये राम चरणसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट रिलीजपूर्वी निर्माते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. उत्तर अमेरिकेत या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आधीच सुरू झाले होते. आता भारतातही त्याची सुरुवात झाली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘गेम चेंजर’ने एका दिवसात ३६०८७ तिकिटे विकली आहेत. या तिकीट विक्रीमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू यांचा समावेश आहे. याशिवाय राम चरणच्या चित्रपटासाठी १५५५ शो बुक करण्यात आले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता दिसत आहे.
रिलीज होण्यापूर्वी किती पैसे मिळाले?
पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंग अहवालाच्या आधारे ‘गेम चेंजर’च्या कमाईवर नजर टाकली, तर रिलीजपूर्वी २५४५७७४४ ब्लॉक सीट्ससह २.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही फक्त पहिल्या दिवसाची कमाई आहे. ॲडव्हान्स बुकिंगचा आज दुसरा दिवस असून त्यामुळे कलेक्शन पुढे जाऊ शकते. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरु आहे.
चित्रपटाची राज्यांनुसार कमाई
राज्यानुसार पाहिल्यास ‘गेम चेंजर’ने आंध्र प्रदेशात ५१. १८ लाख रुपये, कर्नाटकात ३२.८ लाख रुपये, मध्य प्रदेशात ७५.७९ हजार रुपये, उत्तर प्रदेशमध्ये २.३७ लाख रुपये, महाराष्ट्रात १.२५ लाख रुपये आणि दिल्लीत १.९३ लाख रुपये कमावले आहेत. ही कमाईही पहिल्याच दिवशीची आहे, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
‘डाकू राजा’ला देणार टक्कर
एकीकडे राम चरण आणि कियारा अडवाणीचा चित्रपट ‘गेम चेंजर’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई करत आहे. तर दुसरीकडे ‘डाकू महाराज’ बॉक्स ऑफिसवर कब्जा करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा देखील एक तेलुगु चित्रपट आहे ज्यामध्ये नंदामुरी बालकृष्णन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते एनबीके राऊडी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.