Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम चरण आणि उपासनाने केले त्यांच्या जुळ्या मुलांचे नामकरण; सांगितला गोंडस मुलांच्या नावाचा अर्थ

राम चरण आणि उपासना कोनिडेला यांनी ३१ जानेवारी रोजी त्यांच्या आयुष्यात जुळ्या मुलांचे स्वागत केले आणि त्याच वेळी त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. आता या जोडप्यांनी त्यांच्या बाळाचे नामकरण केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 13, 2026 | 09:27 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • राम चरण आणि उपासनाने दिला जुळ्या बाळांना जन्म
  • मुलांचे नामकरण केले नामकरण
  • सांगितला गोंडस मुलांच्या नावाचा अर्थ
 

राम चरण आणि उपासना कोनिडेला यांनी ३१ जानेवारी रोजी जुळ्या मुलांचे, एक मुलगा आणि एक मुलगी यांचे स्वागत केले. आता, त्यांनी यांच्या मुलांचे नाव देखील जाहीर केले आहे, आणि त्यांची सुनंदा झलक चाहत्यांना दाखवली आहे. या जोडप्याने अलीकडेच त्यांच्या हैदराबाद येथील घरी एक नामकरण समारंभ आयोजित केला आणि त्यांच्या मुलाचे नाव ‘शिवराम’ आणि मुलीचे नाव ‘अन्वीरा’. ‘अन्वीरा’ या नावाचा अर्थ देवी असल्याचे म्हटले जात आहे.

राम चरणने सांगितला नावाचा अर्थ

राम आणि उपासना यांनी व्हरायटी इंडियाशी बोलताना मुलांच्या नावाचा अर्थ सांगितले आहे. राम म्हणाला, “आमच्या दोघांसाठी मुलांचे नामकरण हा अत्यंत वैयक्तिक आणि आध्यात्मिक निर्णय होता. उपासना आणि मी यावर चर्चा केली, पण आमचे आई-वडीलही या प्रवासाचा महत्त्वाचा भाग होते. आपल्या संस्कृतीत ज्येष्ठांना ज्ञान आणि आशीर्वाद देणारे मानले जाते, त्यामुळे या प्रक्रियेत त्यांची उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. आमच्या मुलाचे नाव ‘शिवराम’ दोन शाश्वत आदर्शांचे प्रतीक आहे – भगवान शिव आणि भगवान राम – संयमासोबत शक्ती आणि धर्मासोबत भक्ती. तसेच हे माझ्या वडिलांच्या जन्मनाव ‘शिव शंकर वर प्रसाद’ या नावाचा वारसा पुढे नेणारे आहे, त्यामुळे यात परंपरा आणि कृतज्ञतेची भावना सामावलेली आहे.”

जान्हवी कपूरची साऊथमध्ये वाढली मागणी, ‘पेड्डी’ नंतर मिळाली नवी वेब सिरीज; फी कोटींमध्ये

उपासनाने मातृत्वाबद्दल व्यक्त केला आनंद

संवादादरम्यान उपासनाने दुसऱ्यांदा आई होण्याच्या अनुभवाबद्दलही भाष्य केले आणि सांगितले की यावेळी मातृत्व अधिक शांत आणि सहज वाटत आहे. ती म्हणाली, “पहिल्यांदा सर्व काही नवीन असतं. सुंदर, पण थोडंसं कठीणही. यावेळी मात्र मी खूपच शांत आणि स्थिर वाटत होते आहे. अनेक गोष्टी सोडून द्यायला मी शिकले आहे आणि आता छोट्या-छोट्या गोष्टींना मी घाबरत नाही. स्थिरता, नियमित दिनचर्या आणि निःस्वार्थ प्रेम सध्या बाळांना याच गोष्टींची सर्वाधिक गरज असते.” असे ती म्हणाली आहे.

राम चरण आणि उपासना यांनी दिला जुळ्या मुलांना जन्म

अभिनेता राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कोनिडेला यांनी ३१ जानेवारी रोजी जुळ्या बाळांचे एक मुलगा आणि एक मुलगी यांचे आयुष्यात स्वागत केले. आपल्या आनंदाची बातमी शेअर करत दोघांनी एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांची गोंडस दोन्ही बाळ पूर्णपणे निरोगी आहेत.

नानी-ओडेला पुन्हा एकत्र घालणार धुमाकूळ; ‘The Paradise’चा धमाकेदार पोस्टर चर्चेत

राम या अभिनेत्याचं वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याने अपोलो चॅरिटीच्या उपाध्यक्षा उपासना यांच्याशी जून २०१२ मध्ये विवाह केला. त्यांचा साखरपुडा डिसेंबर २०११ मध्ये झाला होता. लग्नापूर्वी दोघे अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होते आणि चांगले मित्रही होते. जून २०२३ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले, जिचे नाव त्यांनी क्लिन कारा ठेवले. त्यानंतर आता २०२६ मध्ये ते पुन्हा एकदा जुळ्या बाळांचे आई-वडील बनले आहेत.

Web Title: Ram charan upasana konidela name their twins reveal meanings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • entertainment
  • Ram Charan
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
4

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.