Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘अनुपमा’ ही मालिका घेणार ‘जनरेशन लीप’!

'स्टार प्लस' वरील प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’ आता ‘जनरेशन लीप’ घेणार आहे. या मालिकेमध्ये नव्या भूमिकेत जुने कलाकार झळकणार आहे. रूपाली गांगुली, अलिशा परवीन आणि शिवम खजुरिया ‘अनुपमा’ मालिकेत हे सगळे स्टार नव्या भूमिकेत दिसणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 11, 2024 | 10:30 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

‘अनुपमा’ या मालिकेला प्रेक्षकांनी वेळोवेळी पसंतीची पावती दिली आहे आणि या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. या मालिकेने आजच्या घडीला लोकप्रियतेची वेगळीच उंची गाठली आहे. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारी कथा असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेने ‘टीआरपी’च्या आलेखावरही वर्चस्व गाजवले आहे. ही मालिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसली. खेळवून ठेवणारे नाट्य आणि या मालिकेला मिळणारी नवी वळणे यामुळे या मालिकेला प्रेक्षकांची कायम पसंती राहिली आहे.

या मालिकेच्या प्रत्येक नव्या भागात, प्रेक्षकांना नवे काहीतरी रंजक आणि पाहायला मिळाले आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘अनुपमा’ या मालिकेला नेहमीच प्रेक्षकांची मोठी प्रशंसा आणि प्रेम लाभले आहे. असे असताना, आता प्रेक्षकांकरता आणखी एक आश्चर्य या मालिकेत उलगडणार आहे, याचे कारण ‘अनुपमा’ ही मालिका चक्क एका पिढीची झेप घेत, नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘अनुपमा’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत रूपाली गांगुली असून, आणखी दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आद्याचे पात्र अलिशा परवीन साकारणार असून, आद्याचा ज्याच्या प्रेमात पडली आहे, तो प्रेम ही व्यक्तिरेखा शिवम खजुरिया साकारणार आहे.

या मालिकेच्या निर्मात्यांनी अलीकडेच नव्या रूपातील मालिकेचा एक वेधक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात ‘अनुपमा’च्या नव्या प्रवासाची झलक मिळते. यात अनुपमा वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे आणि ‘अनु की रसोई’ हा तिचा स्वत:चा व्यवसाय यशस्वी करताना दिसणार आहे. ‘अनुपमा’ला तिच्या कुटुंबाची आठवण येत असते आणि आद्या या तिच्या लेकीला भेटण्याची तिची तीव्र इच्छा असते.

हे देखील वाचा- Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात केला मोठा खुलासा! म्हणाले दाऊद इब्राहिम…

दुसरीकडे, आद्या आता एक टूर गाईड बनली आहे आणि एके दिवशी आद्या एका मंदिरात प्रेमला भेटते. आद्याला बघताच क्षणी प्रेमला देखील तिच्या प्रेमात पडतो. आद्या नात्यातील गुंतागुंतीचा विचार करते आणि तिच्या आईच्या जगापासून दूर आहे. एका नव्या, अनोळखी व्यक्तीच्या प्रयत्नाने आई आणि मुलीतील नाते सुधारेल का? मुलीला शोधून काढण्याचे आईचे प्रयत्न सफल होतील का? हे सगळं या मालिकेत पाहायला मिळणार आहे. १४ ऑक्टोबर पासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘अनुपमा’ मालिकेचा हा नवा प्रवास सुरु होणार आहे.

Web Title: Generation leap will take the popular series anupamaa on star plus channel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 10:30 AM

Topics:  

  • Indian Television

संबंधित बातम्या

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री
1

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
2

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

‘स्टार परिवार’ रक्षाबंधन धमक्यात साजरी करण्यासाठी सज्ज, ‘बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ सर्व दिसणार एकत्र
3

‘स्टार परिवार’ रक्षाबंधन धमक्यात साजरी करण्यासाठी सज्ज, ‘बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ सर्व दिसणार एकत्र

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका
4

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.