(फोटो सौजन्य-Social Media)
बॉलीवूडच्या प्रसिद्ध ॲक्शन चित्रपटांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘वॉर’च्या सिक्वेलमध्ये हृतिक रोशन पुन्हा एकदा आपली जादू दाखवताना दिसणार आहे. 2019 मध्ये सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ने केवळ प्रचंड लक्ष वेधले नाही तर कथेतील हृतिक आणि टायगर श्रॉफच्या स्वॅगनेही लोकांची मने जिंकली आहेत. हँडसम लूक असलेला हृतिक रोशन पुन्हा एकदा ‘वॉर 2’मध्ये त्याचा स्वॅग आणि अभिनयाची झलक दाखवणार आहे. सिद्धार्थ आनंदच्या जागी अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हृतिक व्यतिरिक्त, कियारा अडवाणीचे नाव देखील चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये समाविष्ट आहे आणि आता या चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर आले आहे, ज्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
‘वॉर 2’ चित्रपटाबाबत मोठे अपडेट
वॉर चित्रपटाप्रमाणेच वॉर २ हा देखील ॲक्शनपट असणार आहे. कियारा या चित्रपटात हृतिकच्या लेडी लव्हची भूमिका साकारणार आहे. इटलीत हृतिक आणि कियारा यांच्यात एक रोमँटिक गाणे शूट होणार असल्याची बातमी समोर आली आहे. या रोमँटिक गाण्याचे शूटिंग 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून ते सुमारे 6 दिवस चालणार आहे.
या दिवशी ज्युनियर एनटीआरसोबत शूटिंग होणार सुरु
‘वॉर 2’मध्ये हृतिक ज्युनियर एनटीआरच्या सोबत दिसणार आहे. या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे शूटिंग या महिन्यापासून सुरू होणार असल्याचे समोर आले आहे. एकीकडे हृतिक कियारासोबत रोमँटिक सीन शूट करणार आहे, तर दुसरीकडे ज्युनियर एनटीआरचे ॲक्शन सीनही याच महिन्यात सुरू होणार आहे.
हे देखील वाचा- सलमान खानच्या ‘सिकंदर’मध्ये रश्मिकासह ‘ही’ साऊथ अभिनेत्री झळकणार, सेटवरील फोटो झाले व्हायरल!
सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे
इटलीमध्ये कियारा आणि हृतिक यांच्यात ज्या ठिकाणी शूटिंग होणार आहे त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सेटवरून कोणतेही चित्र किंवा व्हिडिओ लीक होऊ नये यासाठी YRF सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि कियारा अडवाणीचा रोमान्स पडद्यावर पाहायला मिळणार आहे.