(फोटो सौजन्य - Instagram)
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल ५’ प्रदर्शित होण्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत. हा चित्रपट ६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी दोन दिवसांपूर्वीच ॲडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे. दुसऱ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे, त्यानुसार हा चित्रपट पहिल्या दिवशी प्रेक्षकांना आकर्षित करू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच एखादा चित्रपट दोन क्लायमॅक्ससह दाखल होणार आहे. ‘हाऊसफुल ५’ ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये किती कोटींची कमाई केली आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
हाऊसफुल ५ चे ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन
निर्मात्यांनी रविवारी ‘हाऊसफुल ५’ चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू केले होते. आज, मंगळवारी दुसऱ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘हाऊसफुल ५’ चे ॲडव्हान्स बुकिंग ७५१७ शोजने सुरू झाले. मंगळवारी ८५१६ शोसाठी एकूण ४५,६१२ तिकिटे विकली गेली आहेत.
कर्नाटक उच्च न्यायालयाने कमल हसन यांना फटकारले, कन्नड वादात आणखी वाढ!
हाऊसफुल ५ ची रिलीजपूर्वीची कमाई
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘हाऊसफुल ५’ ने रिलीजपूर्वीच १.५३ कोटी रुपयांची कमाई करून निर्मात्यांच्या खिशा मालामाल केला आहे. ब्लॉक सीट्ससह, ही कमाई ४.७९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सर्वाधिक तिकिट विक्री महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये झाली आहे. दिल्लीमध्ये ३५.६५ लाख किमतीची तिकिटे विकली गेली आहेत, तर महाराष्ट्रात ४४.१३ लाख किमतीची तिकिटे विकली गेली आहेत. अश्याप्रकारे या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कामगिरी केली आहे.
पहिल्या दिवशी बंपर ओपनिंग मिळेल का?
अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट पहिल्या दिवशी बंपर ओपनिंग करेल की नाही हे पुढील दोन दिवसांच्या ॲडव्हान्स बुकिंगवर अवलंबून असेल. सध्या, ट्रेड अॅनालिस्टचा असा विश्वास आहे की ‘हाऊसफुल ५’ अक्षय कुमारच्या मागील रिलीज ‘गोल्ड’ (२५.२५ कोटी) आणि ‘मिशन मंगल’ (२९.१६ कोटी) ला मागे टाकू शकतो.
Maalik चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज, राजकुमार रावचा रक्ताने माखलेला लुक व्हायरल
पहिल्यांदाच दोन क्लायमॅक्स पाहायला मिळणार
हे लक्षात घेण्यासारखे आहे की साजिद नाडियाडवालाने ‘हाऊसफुल ५’ चा पहिल्यांदाच प्रयोग केला आहे आणि दोन क्लायमॅक्ससह चित्रपट बनवला आहे. या अंतर्गत, हा चित्रपट दोन वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. तिकीट खरेदी केल्यावर, त्यांना ‘हाऊसफुल ए’ किंवा ‘हाऊसफुल बी’ चे तिकीट हवे आहे असे दोन पर्याय दिले जातील. म्हणजेच क्लायमॅक्स एक किंवा दोन असे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.