(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’ हा ताकदीचा खेळ नसून, माणसांच्या भावनांचा खेळ आहे. या सीझनचा आता चौथा आठवडा सुरू झाला असून सदस्यांचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सर्व सदस्यांनी तिन आठवड्यातच वेगवेगळी नाती निर्माण केली आहेत. तसेच या घरात छोटा पुढारी आणि निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला देखील मिळाले आहे. परंतु, आज या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. निक्की आणि घन:श्याम मध्ये आज रक्षाबंधनाच्या दिवशी मोठा वाद झालेला दिसून येणार आहे.
‘बिग बॉस’ चा नवीन प्रोमो आला
कलर्स मराठी वाहीनीने त्यांच्या स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘बिग बॉस मराठी ५’ चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सर्व स्पर्धक आज रक्षाबंधन साजरे करताना दिसत आहेत. पण हा सण साजरा करताना मात्र, निक्की आणि घन:श्याम मध्ये चांगलाच वाद होताना या प्रोमो मध्ये दिसला आहे. प्रोमोमध्ये निक्की घन:श्यामला म्हणतेय, “तू फेक आहेस.” त्यावर घन:श्याम तिला विचारतो, “काय फेक वागलोय ते तर सांग.. तू किती आपली आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय… तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता मी.. यावर निक्की म्हणते, “नको देऊ. त्यावर घन:श्याम म्हणतो, “निक्कू ताई बोलल्यामुळेच घात झालाय ना.” असे या दोघांमध्ये संवाद होताना दिसत आहेत.
हे देखील वाचा- Bigg Boss Marathi: मराठमोळ्या बिग बॉसमध्येही रंगणार तुफानी, मोठ्या कलाकारांचा सहभाग
नेटकऱ्यांनी दिला प्रतिसाद
निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. आम्ही दोघे बहीण -भाऊ म्हणत छोट्या पुढारीने निक्की सोबत मैत्री केली. पण दोघांच्या पप्पी आणि झप्पीमुळे प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली उडवली. आता ऐन रक्षाबंधनच्या दिवशीच त्यांच्यात मोठा वाद झालेला पाहायला मिळेल आहे. या प्रोमोला चाहत्यांना चांगलाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.