बिग बॉस मराठी स्पर्धक यादी
मराठी बिग बॉसचा हा नवा सिझन रितेश देशमुखांचे नाव निवेदक म्हणून जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. यावेळी स्पर्धक कोण असणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती आणि आता अखेर चाहत्यांना कोण स्पर्धक आहेत कळले आहे.
मराठीतील मोठ्या कलाकारांचा यावेळी समावेश आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर, कॉमेडी किंग पंढरीनाथ कांबळे ज्या pady या नावाने ओळखले जाते. जान्हवी किल्लेदार जिने मालिकेतून वॅम्पची भूमिका आतापर्यंत निभावली होती, ती खऱ्या आयुष्यात नक्की कशी आहे हे आता तिच्या चाहत्यांना कळणार आहे. योगिता चव्हाण जिचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. तर हिंदी बिग बॉस गाजवणारी निक्की तांबोळीदेखील यावेळी आली असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याशिवाय कोकण गर्ल अंकिता वालावलकर आणि चॉकलेट बॉय निखिल दामलेने एंट्री घेतली आहे. इंडियन idol चा पहिला विजेता अभिजित सावंतचे नावही यात समाविष्ट आहे. गेल्या तिन्ही सीझनमध्ये मराठी इंडस्ट्रीतील तितकी मोठी नावं नव्हती पण शिव ठाकरेनंतर आता मराठीचा सीझन कोण गाजवणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शिव ठाकरेने मराठी बिग बॉसनंतर हिंदी बिग बॉसही गाजवला आणि अगदी रितेश देशमुखलाही इंप्रेस केले आहे.
या मोठ्या नावांशिवाय काही अन्य नावांचाही यामध्ये समावेश आहे. धनंजय पोवार, पुरूषोत्तम पाटील, आर्या जाधव, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, घनश्याम दरवडे आणि इरिना रूद्रकोवा अशी या स्पर्धकांची नावे आहेत.
यावर्षी आता हा सिझन कोण गाजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 28 जुलै रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रिमियर झाला असून आता 3 महिने काय धुमाकूळ चालणार आणि कोणते स्पर्धक यावेळी बिग बॉस मराठी गाजवणार याचीच चर्चा सगळीकडे रंगली आहे.
पाहा बिग बॉसचा प्रोमो