सोनाक्षी सिन्हाच्या ‘जटाधारा’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, ‘या’ महिन्यात होणार प्रदर्शित
जटाधारा हा एक पौराणिक नाट्यचित्रपट आहे ज्यात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिका साकारताना दिसणार असून ७ नोव्हेंबर २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या ‘जटाधारा’चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
जटाधारा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार रिलीज
चित्रपटात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत
सुधीर बाबू- आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या जटाधारा या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जटाधारा या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. याआधी चित्रपटाच्या धमाकेदार टीजरला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. निर्मात्यांनी एका जबरदस्त मोशन पोस्टर सोबत रिलीज डेटची घोषणा केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जयस्वाल आणि वेंकट कल्याण यांनी केले आहे. या चित्रपटातून सोनाक्षी सिन्हा टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात दिव्या खोसला, शिल्पा शिरोडकर, इंदिरा कृष्णा, रवी प्रकाश, नवीन नेनी, रोहित पाठक, झांसी, राजीव कनकला आणि शुभलेखा सुधाकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.