(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ZEE5 द्वारे प्रेक्षकांसाठी मॅडॉक फिल्म्सतर्फे ‘तेहरान’ची पर्वणी सादर केली जात आहे. हा सिनेमा जिओ पॉलिटिकल थ्रिलर असून त्यात जॉन अब्राहम, मानुषी छिल्लर, नीरू बाजवा आणि मधुरिमा यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार. येत्या 14 ऑगस्ट 2025 रोजी या सिनेमाचं प्रीमियर होणार आहे. खऱ्या घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. सिनेमात इस्त्राइल आणि इराण यांच्यात जागतिक पातळीवर असलेला तणाव पाहायला मिळणार आहे. अरूण गोपालन यांचं दिग्दर्शन असलेला ‘तेहरान’ आंतरराष्ट्रीय हेरगिरीच्या संशयास्पद विश्वावर आधारित असून त्यात फक्त एका माणसावर निष्ठा आणि धोका यांच्यातला तोल सांभाळण्याची जबाबदारी असते.
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे सिनेमाची कथा 2012 मध्ये दिल्लीच्या इस्त्रायली दुतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाने होते. या खऱ्या घडलेल्या घटनेचे परराष्ट्रसंबंधांच्या पातळीवर रहस्य उमटतात. एसीपी राजीव कुमार (जॉन अब्राहम) एका गुप्त मोहिमेत ओढला जातो. वेगवेगळे खंड पार करायला लावणारी, वेगवेगळ्या विचारसरणीला सामोरं जायला लावणारी आणि तुटत आलेल्या सहकार्याची परीक्षा बघणारी ही मोहीम जशी पुढे जाते, तसं चूक आणि बरोबरमधली रेषा धूसर होत जाताना यामध्ये दिसणार आहे. राजीव खऱ्या अर्थाने भारतीय देशभक्त आहे आणि अज्ञात राहून देशाच्या भविष्याला आकार देताना आणि सगळ्या गोष्टीचा शोध घेताना दिसणार आहे.
ठरलं! प्राजक्ता गायकवाडने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात
या सिनेमात नीरू बाजवा, मानुषी छिल्लर आणि मधुरिमा तुली यांच्या प्रमुख भूमिका असून तेहरान हा फक्त जागतिक पातळीवरची गोष्ट दाखवणारा सिनेमा नाही, तर तो सायकॉलॉजिकल आणि राजकीय उलथापालथीची कहाणी सांगणारा आहे. या सिनेमात हेरगिरीचं जाळं पाहायला मिळतं, शिवाय आंतरराष्ट्रीय राजकारण, विश्वासघात आणि चतुरपणे खेळले जाणारे मनाचे खेळही उत्कंठा वाढवतात.
हिंदी ZEE5 च्या बिझनेस हेड कावेरी दास म्हणाल्या, ‘ZEE5मध्ये आम्ही मनोरंजनाबरोबरच आपल्या काळाच्या घडामोडी दाखवणाऱ्या गोष्टी मांडण्यावर भर देतो. या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आम्हाला तेहरान हा सिनेमा प्रेक्षकांसाठी सादर करताना आनंद होत आहे. वेगवान घडामोडी असलेला हा जिओ पॉलिटिकल थ्रिलर, देशभक्ती आणि संघर्षाच्या संशयास्पद दुनियेत वावरणाराआहे. मॅडॉक फिल्म्सच्या सहकार्याने आव्हान देणारी गोष्ट सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.’
तेहरान चित्रपटाची रिलीज डेट वारंवार बदलली
जॉन अब्राहमच्या तेहरान चित्रपटाची रिलीज डेट सारखी बदलण्यात आली आहे. वृत्तानुसार, यापूर्वी हा चित्रपट २०२३ च्या प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मात्यांनी तो पुढे ढकलला. त्यानंतरही चित्रपटाच्या रिलीजची तारीख अनेक वेळा बदलण्यात आली आणि आता अखेर तो १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. अरुण गोपालन दिग्दर्शित या चित्रपटात जॉनसोबत नीरू बाजवा, मानुषी चिल्लर आणि एलनाज नोरोझी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट मॅडॉक फिल्म्स आणि पॅसिफिक वर्ल्डवाइड फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. त्याचे निर्माते दिनेश विजन, शोभना यादव आणि संदीप लेझेल आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्ली, मुंबई आणि ग्लासगो, स्कॉटलंडमध्ये झाले आहे.
जॉन अब्राहमच्या वर्कफ्रंटबद्दल
जॉन अब्राहमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याचा शेवटचा हिट चित्रपट २०२३ चा पठाण होता. त्यानंतर तो ‘वो भी क्या दिन थे’, ‘वेदा, द डिप्लोमॅट’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. तसेच, यापैकी कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही. तेहरान व्यतिरिक्त तो ‘तारीख’ चित्रपटात दिसणार आहे. त्याचे चित्रीकरण सध्या सुरू आहे.