फोटो सौजन्य - Social Media
आमिर खानचा मुलगा जुनैदने ‘महाराजा’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटामधील त्याचा अभिनय पाहून चाहत्यांच्या तो पसंतीस आला. नंतर त्याच्या अभिनय कौशल्याने त्याने चाहत्यांची मने जिंकली. जुनैदच्या कलाकुसरमध्ये आमिरच्या कामाची झलक लोकांना पाहायला मिळाली. मात्र जुनैदने ओटीटीमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र आता तो मोठ्या पडद्यावरही अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाला आहे.
जुनैद मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास तयार
जुनैद खानच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या चित्रपटातून तो रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘महाराजा’ चित्रपटातून स्वत:चा चांगला चाहता वर्ग निर्माण करणारा जुनैद आता मोठ्या पडद्यावरही अभिनयाची परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचवेळी, ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी एका मोठ्या आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही.
श्रीदेवीच्या मुलीसोबत झळकणार अभिनेता
जुनैद खानच्या आगामी चित्रपटासोबतच त्याच्या चित्रपटामधील लेडी लव्हचीही घोषणा करण्यात आली आहे. तो श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत रोमँटिक अंदाजात या चित्रपटामध्ये दिसणार आहे. रुपेरी पडद्यावरचा हा या दोघांचाही एकत्र पहिलाच चित्रपट असणार आहे. चित्रपटाच्या घोषणेबरोबरच प्रदर्शनाची तारीखही लॉक झाली आहे. परंतु दोघांच्या आगामी चित्रपटाचे नाव अद्यापही समोर आलेले नाही आहे.
हे देखील वाचा – National Cinema Day : कोणताही चित्रपट पहा फक्त 99 रुपयांमध्ये, उशीर करू नका; लवकर ऑनलाइन तिकीट करा बुक!
चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. जुनैद आणि खुशीच्या या चित्रपटाचे शीर्षक जाहीर करण्यात आलेले नाही. पण एकत्र चित्रपट करण्याच्या घोषणेने त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तथापि, असे काही वापरकर्ते आहेत ज्यांना वाटते की खुशी कपूरने अभिनयात अधिक प्रवीण होणे आवश्यक आहे.