फोटो सौजन्य - iSTock
कोरोना कालावधीनंतर लोकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी 2022 मध्ये राष्ट्रीय चित्रपट दिन सुरू करण्यात आला. आता त्याची तिसरी आवृत्ती 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने यावर्षी राष्ट्रीय चित्रपट दिनाची तारीख म्हणून 20 सप्टेंबर निश्चित केली आहे. नॅशनल मल्टीप्लेक्स ट्रेड बॉडीने म्हटले आहे की, देशभरातील चित्रपटगृहांमध्ये सिनेमाप्रेमींसाठी केवळ ९९ रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध केली जाणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, मूव्ही टाइम आणि डिलाइटसह चार हजारांहून अधिक स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार आहेत.
या चित्रपटांमध्ये युद्ध, कहां शुरू कहां खमिर, मराठी चित्रपट नवरा माझा नवसाचा 2, पंजाबी चित्रपट सुचा सूरमा, हॉलिवूड चित्रपट नेव्हर लेट गो आणि ट्रान्सफॉर्मर्स वन यासह द बकिंगहॅम मर्डर्स आणि पंजाबी चित्रपट अर्दास सरबत दे भले यांचा समावेश आहे .
अनेक मोठे चित्रपट राष्ट्रीय चित्रपट दिनाचा भाग असतील
यासोबतच, स्त्री 2 सोबत बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करणारे तुंबड आणि वीर जरा हे चित्रपट देखील राष्ट्रीय चित्रपट दिनाचा एक भाग असतील. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना सिनेमाचा आनंद देण्यासाठी हा दिवस गेल्या दोन वर्षांपासून साजरा केला जात आहे.
हे देखील वाचा – छाया कदम यांनी सांगितली सौंदर्याची व्याख्या; म्हणाल्या, “दीपिका, आलिया सारखं दिसण्याचा प्रयत्न करेन, पण…”
या यशात योगदान देणाऱ्या सर्व चित्रपट रसिकांचे आभार असे असोसिएशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे. जे अद्याप त्यांच्या स्थानिक चित्रपटगृहात परतले नाहीत त्यांना पुन्हा एकदा आमंत्रण दिले जात आहे. उल्लेखनीय आहे की राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या मागील दोन आवृत्त्यांमध्ये सुमारे 60 लाख लोकांनी चित्रपट पाहिले आहेत. आणि आता ही संख्या दर राष्ट्रीय चित्रपट दिनाला वाढते आहे. तुम्हाला जर फक्त ९९ रुपयात चांगल्या आणि सुपरहिट चित्रपटांचा अनुभव हवा असेल तर आताच त्वरित तिकीट बुक करा आणि चित्रपटांचा आनंद लुटा.