
फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉस 18 चे चाहते विकेंडच्या वारची आतुरतेने वाट पाहत असतात. विकेंडच्या वारला सलमान खान घरातील स्पर्धकांची घरडपट्टी काढतो. यावेळी प्रेक्षक शोवर प्रचंड संतापले आहेत. या सीझनचे सहा आठवडे झाले आहेत आणि बिग बॉसच्या प्रेक्षकांना दिसून येत आहे की, बिग बॉस त्यांचा लाडला विवियन डिसेना त्याचा मित्रपरिवार तर दुसरीकडे उर्वरित बाकीच्या सदस्यांसोबत मोठ्या प्रमाणात पक्षपात केला जात आहे. त्यामुळे शोचा घसरलेला टीआरपी वाढवण्यासाठी निर्माते प्रत्येक वेळी नवनवे ट्विस्ट घेत आहेत. आता सोशल मीडियावर काही प्रोमो सोशल मीडियावर बिग बॉसने शेअर केले आहेत. यामध्ये स्पर्धकांच्या घरामधील म्हणजेच त्याच्या बाहेरच्या कुटूंबीय येऊन त्यांना रिअॅलिटी चेक देणार आहेत.
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये टेलिव्हिजनचा प्रसिद्ध निर्माता संदिप सिकंद त्याचा मित्र म्हणजेच बिग बॉसच्या घरामधील सदस्य करणवीर मेहराला रिअॅलिटी चेक देताना दिसणार आहे. यावेळी करणवीर मेहराला बिग बॉसच्या कॉन्फेशन रूममध्ये बोलावल्यावर बिग बॉस म्हणतात की, करण आम्ही तुम्हाला तुमच्या खेळाबद्दल स्पष्ट सांगण्यासाठी आम्ही कोणाला तरी बोलावले आहे. यावर संदिप सिकंद करणवीरला म्हणतो की, मी तुझ्या आईशी बोललो आणि तिने तुझ्यासाठी मेसेज पाठवला आहे आणि ती म्हणाली आहे की, तू तुझा खेळ खेळ. पुढे तो म्हणाला की, मी तुला २००६ पासून ओळखत आहे आणि ज्याप्रकारे तू बाहेर आहेस तसा अजिबात दिसत नाही आहेस.
पुढे संदीप म्हणाला की, का हा करण मागे गेला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तू नेहमी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस. घरामध्ये मुद्दे असतात पण तू मुद्द्याच्या शेवटी एखादी टिपणी करून निघून जातोस. जर तुला बोलायचं असत ते तू का नाही बोलत आहेस? बिग बॉसचा खेळ हा व्यक्तिमत्वाचा खेळ आहे. तू प्रेक्षकांसमोर का नाही बोलत आहेस की मला हा खेळ माहिती आहे आणि मी हा खेळ खेळू शकतो आणि मी आता तो खेळ खेळणार आहे. तू बिग बॉसमध्ये आहेस करण… तुला जिंकण्यासाठी खेळायचे आहे.
Karanveer ki mom ka sandesha lekar aaye Sandy. Kya dikhega ab front foot mein unka game? Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par. @KaranVeerMehra #BiggBoss18 #BB18 #BiggBoss pic.twitter.com/lnL9J28rEj — ColorsTV (@ColorsTV) November 17, 2024
या आठवड्यामध्ये ७ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. परंतु त्यानंतर टाइम गॉड रजत दलालने दिग्विजय राठीला सुरक्षित केले आणि आता सध्या ६ स्पर्धक नॉमिनेट आहेत. त्यामुळे यामधील या आठवड्यामध्ये कोणताही स्पर्धक घराबाहेर होणार नाही अशी माहिती समोर आली आहे.