फोटो सौजन्य - Colors सोशल मीडिया
करणवीर मेहरा : बिग बॉस १८ चा हा खेळ दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. दिवसेंदिवस या खेळाची मज्जा आणि बिग बॉसच्या घरामधील स्पर्धकांसाठी हा खेळ कठीण होत चालला आहे. या आठवड्यामध्ये चर्चेत असलेला सदस्य म्हणजेच करणवीर मेहरा. संपूर्ण आठवडाभर करण आणि त्याच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर आणि घरच्या सदस्यांनी केली आहे. आता सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला होता यामध्ये घरामध्ये आलेली नवी वाईल्ड कार्ड सदस्य एडिनसाठी करणवीर मेहरा खेळत होता तर ईशा सिंह हिच्यासाठी अविनाश मिश्रा खेळत होता. या टास्कचे संचालक शिल्पा शिरोडकरला करण्यात आले होते. यावेळी तिने तिच्या निर्णयाने ईशा सिंहला टाइम गॉड बनवले आहे, त्यामुळे आता शिल्पा शिरोडकर आणि करणवीर मेहरा यांच्यामध्ये वाद पाहायला मिळणार आहे.
आता बिग बॉसचा आजच्या नव्या आगामी भागाचा नवा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आता करणवीर मेहरा कबीर सिंहच्या अवतारात दिसणार आहे. ‘बिग बॉस 18’ च्या नवीन प्रोमोमध्ये घरामधील सदस्य राशनसाठी भांडताना दिसणार आहेत. वास्तविक, ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. बिग बॉस म्हणाले, ‘मी टोपलीतील रेशन वाटून घेतले आहे. तुम्ही एका रांगेत बसाल आणि एक एक टोपली पास कराल. जेव्हा टोपली ओळीत बसलेल्या शेवटच्या सदस्यापर्यंत पोहोचते तेव्हा त्याला घरगुती रेशन मिळेल.
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बिग बॉस पुढे म्हणाले, ‘ज्या सदस्याच्या हातात टोपली आहे, त्याला टोपली पुढे करायची नसेल तर तो तसे करू शकतो.’ बिग बॉसने टास्क समजावून सांगितल्यानंतर, संगीत वाजते आणि म्युझिकल चेअर गेम सुरू होतो. चुम आधी खुर्चीवर बसते. अशा परिस्थितीत चुमला रेशन निवडण्याची संधी मिळते. चुम अंड्याची टोपली उचलतो आणि तिच्याकडे ठेवतो. दुसरी फेरी सुरू होते आणि जेव्हा संगीत थांबते, तेव्हा करणवीर सर्वात आधी खुर्चीवर बसतो. अविनाश मिश्रा करणवीरच्या मागे उभा असतो. अशा परिस्थितीत टाइम गॉड ईशा सिंग करणवीरला सांगते की संगीत थांबल्यावर तो पुढे गेला होता, त्यामुळे तो दुसऱ्या खुर्चीवर बसेल. अविनाश पहिल्या खुर्चीवर बसेल.
करणला राग येतो. करणसोबतच शिल्पा शिरोडकर आणि दिग्विजय राठीही संतापताना दिसत आहेत. तिघेही ईशाशी वाद घालू लागतात आणि काम तिथेच थांबते. यावेळी करणवीरला जेव्हा इशा उठायला सांगते तेव्हा तो म्हणतो की, “तू कोणालाही विचार मी पुढे गेलेलो नाही. मला नको सांगुस कोणालाही विचार” यावर इशा म्हणते की, मी सांगणार आहे मला तू पुढे येताना दिसत आहेस. करण इशाला म्हणतो की, तुला ज्याला विचारायचं आहे त्याला विचार मी इथेच होतो.
यावर आता करणवीर मेहरा शिल्पावर भडकतो आणि म्हणतो की, “तू तिला फेअरनेसवर टाइम गॉड बनवले होतेस ना. हे आहे फेअरनेस, दिसतंय का तुला फेअरनेस, याबद्दल मी तुला वारंवार सांगत होतो”.
Promo #BiggBoss18
New task in the house #KaranveerMehra angry pic.twitter.com/qHgunUdjUZ— The Khabri (@TheKhabriTweets) November 28, 2024
आजच्या भागामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इशा काय निर्णय घेईल हे पाहणं मनोरंजक ठरेल. या प्रोमोवर प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत यामध्ये करणवीर मेहरा प्रेक्षक सपोर्ट करताना दिसत आहेत.