(फोटो सौजन्य - Instagram)
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूर आता या जगात राहिले नाही आहे. गुरुवारी संध्याकाळी संजय यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या वेळी ते यूकेमध्ये होते आणि आणि मित्रांसह पोलो सामना खेळत होते. पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात एक मधमाशी शिरली, त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तसेच आता त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. या बातमीने सगळे धक्क झाले आहे. आता या मोठ्या उद्योजकाचे कसे झाले जाणून घेऊयात.
मधमाशीमुळे झाला संजय यांचा मृत्यू?
असे म्हटले जात आहे की, संजय हे इंग्लंडच्या गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलोच सामना खेळत असताना त्याच्या तोंडात एक मधमाशी शिरली. त्यानंतर संजयला अस्वस्थ वाटू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, हा त्रास नंतर वाढत गेला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मधमाशीने त्याच्या घशात चावा घेतला ज्यामुळे त्याच्या वेदना वाढल्या आणि ते जागीच मरण पावले. या सगळ्यामुळे आता सगळे चकीत झाले आहे.
अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आणि इंस्टाग्रामवर लिहिले, ‘संजय कपूर यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. १२ मे रोजी सकाळी त्यांचे इंग्लंडमध्ये निधन झाले. हे खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांना माझ्याकडून खूप दुःख आहे. ‘ओम शांती.’ असे म्हणून त्यांनी त्यांचे दुःख व्यक्त केले आहे.
Deeply saddened at the passing of @sunjaykapur : he passed away earlier today in England: a terrible loss and deepest condolences to his family and to his colleagues @sonacomstar …Om Shanti — SUHEL SETH (@Suhelseth) June 12, 2025
काही तासांपूर्वी संजय यांनी केली होती पोस्ट
काल ११ जून रोजी दुपारी अहमदाबादमधील भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. संजय कपूर यांनाही या अपघाताने खूप दुःख झाले. त्यांच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्यांनी या दुःखद घटनेबद्दल इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. आणि काही तासानेच त्यांनी ही दुःखद बातमी समोर आली.
संजय कपूर यांनी अहमदाबादमधील भीषण विमान अपघाताबाबत लिहिले, ‘अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी हृदयद्रावक आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. देव त्यांना या कठीण काळात शक्ती आणि धैर्य देवो.’ ही पोस्ट त्यांची शेवटची सार्वजनिक पोस्ट ठरली आहे. देशातील प्रतिष्ठित उद्योगपतींमध्ये गणल्या जाणाऱ्या संजय कपूर यांना पोलो खेळावर खूप प्रेम होते आणि हा छंद त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही त्यांच्यासोबत होता.