कतरिनाच्या प्रेमाच्या रंगात रंगला विकी कौशल, कुटुंबासोबत होळी केली साजरी! (फोटो सौजन्य - Instagram)
१४ मार्च २०२५ रोजी, संपूर्ण देश होळी साजरी करत आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनीही त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील त्यांच्या घरी रंगांचा सण साजरा केला. त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जोडप्यांची शेअर केलेल्या फोटोमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल विकीचे आई-वडील, शाम कौशल आणि वीणा कौशल, तसेच त्याचा भाऊ सनी आणि कतरिनाची बहीण इसाबेल कैफ हे सगळे एकत्र दिसत आहेत.
पहिल्या फोटोमध्ये, विकी, कतरिना, इसाबेल आणि सनी यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. आणि ते हवेत रंग उधळताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर रंग लावलेला दिसत असून, सगळे आनंदी दिसत आहेत.
तर, दुसऱ्या फोटोमध्ये विकी, कतरिना आणि त्यांचे पालक त्यांच्या चाहत्यांना 'होळीच्या शुभेच्छा' देताना दिसत आहे आणि तो एक आनंददायी क्षण वाटत आहे. कुटुंब होळी खेळण्यासाठी एकत्र आले आणि ते मजा मस्ती करताना दिसत आहेत.
तसेच शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये करताना विकीच्या गालाला रंग लावताना दिसत आहे. तसेच, कतरिना चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद होत आहे. आणि कंमेंट करून त्याला प्रतिसाद देत आहे.