Kiran Rao (फोटो सौजन्य - Instagram)
बॉलीवूडचा स्टार आमिर खान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत आहे. त्याने एकदा नाही तर दोनदा लग्न केले आणि या नंतर या दोनी लग्नाचा घटस्फोट झाला. 2021 मध्ये त्याने सोशल मीडियावर आपली दुसरी पत्नी किरण राव हिच्यापासून घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. परंतु ही बातमी खरी आल्यामुळे चाहत्यांनी याचा स्वीकार केला.
आमिर खान आणि किरण राव या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतरही दोघेही चांगले मित्र म्हणून एकमेकांच्या आयुष्यात आहेत. प्रत्येक सुख-दु:खात दोघेही एकमेकांना साथ देत आहेत. आता दिग्दर्शक किरण रावने पुन्हा एकदा आमिरसोबतच्या घटस्फोटावर आपले वक्तव्य स्पष्ट केले असून, या विषयी आता चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.
घटस्फोटानंतर किरण राव खूप आनंदी आहे
घटस्फोटानंतर किरण राव आणि आमिर खान यांनी अनेक प्रसंगी त्यांच्या नात्याबद्दल खुलासा करताना दिसले आहेत. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार पुन्हा घडला आहे. घटस्फोटाबाबत किरणने ‘फये डिसूझा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ती खूप आनंदी आहे. “मला वाटते की नातेसंबंध वेळोवेळी पुन्हा संवाद साधने आवश्यक आहे कारण जसे जसे आपण वाढतो तसतसे आपण माणूस म्हणून बदलतो. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता होते आणि मला असे वाटले की हे (घटस्फोट) तुम्हाला आनंदी करेल आणि खरे सांगायचे तर, यामुळे मला खूप आनंद झाला आहे. असे तिने या मुलाखती दरम्यान आमिर खान आणि तिच्या घटस्फोटाबद्दल व्यक्त होताना दिसली.
हे देखील वाचा- सुष्मिता सेन आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पुन्हा दिसले सोबत; चाहते म्हणाले ब्रेकअपनंतर…
किरण म्हणाली ‘खूप आनंदायी घटस्फोट झाला’
या घटस्फोटाबद्दल किरण पुढे म्हणाली, “आमिरच्या आधी मी बराच काळ अविवाहित होते. मी माझ्या स्वातंत्र्याचा खरोखर आनंद लुटला. मी एकटी होते, परंतु आता माझा मुलगा देखील आझाद झाला आहे, त्यामुळे मी कधी एकटी राहत नाही. मला वाटते की एकटेपणा ही एकमेव गोष्ट आहे ज्याबद्दल बहुतेक लोक थोडे चिंतित असतात. जेव्हा मी घटस्फोट घेतला आणि जोडीदार गमावला, तेव्हा मला अजिबात एकटेपणा वाटला नाही. खरे तर मला दोन्ही कुटुंबांचा पाठिंबा आहे. त्याचे कुटुंब आणि माझे कुटुंब या दोघांनीही मला भरपूर आधार दिला आहे. हा अत्यंत सौहार्दपूर्ण घटस्फोट झाला आहे. असे ती म्हणाली.
लग्नाच्या 15 वर्षानंतर वेगळे झाले
किरणने देखील कबूल केले की त्यांचे 15 वर्षांचे वैवाहिक जीवन संपवणे दोघांसाठी सोपे नव्हते. किरणने हे उघड केले की बॉलीवूड अभिनेता आमिर खानला “भावनिक आणि मानसिकरित्या तेथे पोहोचण्यास थोडा वेळ लागला.” परंतु या सगळ्यानंतर सगळे सुरळीत झाले आणि हे घडून आले. असे तिने या मुलाखतीदरम्यान घटस्फोटाचा खुलासा केला.