फोटो सौजन्य : सोशल मीडिया
नवी दिल्ली : सुष्मिता सेन बॉलीवूडमधलं असं एक नाव आहे जिचा आजही इंडस्ट्रीवर दबदबा आहे. चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर ती सध्या ओटीटीवर सक्रिय आहे. या अभिनेत्रीच्या ‘आर्या’ आणि ‘ताली’ या ॲक्शन वेब सीरिजचे सर्वांनीच खूप कौतुक केले. अलीकडेच सुष्मिता सेन एका अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाली होती जिथे तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुश्मितासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलही दिसला. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांनी 2021 मध्ये त्यांचे नाते संपले असल्याची घोषणा केली होती. परंतु गेल्या वर्षीपासून हे जोडपे पुन्हा एकत्र दिसत आहेत. सुष्मितासोबत रोहमनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून चाहत्यांनी पुन्हा भुवया उंचावल्या.
सुश्मिता आणि रोहमन शॉल पुन्हा सोबत ?
अवॉर्ड फंक्शनमधून बाहेर पडताना सुष्मिता सेनला पापाराझींनी घेरले होते. रोहमनने सुष्मिताला गर्दीतून सुखरूप बाहेर काढून गाडीपर्यंत पोहोचवले. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचा हा क्यूट व्हिडिओ पापाराझी व्हायरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सुष्मिता सेनला अनेकदा रोहमन शॉलसोबत स्पॉट केले जाते. अभिनेत्री अनेकदा त्याच्यासोबत दिसली. पण डिसेंबर २०२१ मध्ये सुष्मिता सेनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून रोहमनसोबतच्या ब्रेकअपची माहिती दिली होती. त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले होते की, आता ते रिलेशनशिपमध्ये नाहीत. पण त्यांची मैत्री अजूनही कायम आहे. त्यानंतर सुष्मिता सेनचे नाव ललित मोदींसोबतदेखील जोडले गेले होते.
चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुश्मिताच्या चाहत्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही. त्याच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. या व्हिडिओवर एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ‘त्यांचे ब्रेकअप झाले होते, पण हे दोघे एकत्र खूप छान दिसत आहेत’. तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली. ‘रोहमन शॉलबद्दल आदर वाढला आहे, तो किती प्रोटेक्टिव्ह आहे’.