
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
इतनी मोहोब्बत है फेम अभिनेत्री कृतिका कामरा गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने एक फोटो शेअर करून तिच्या नात्याचे संकेत दिले होते, परंतु ती कोणाला डेट करत आहे हे तिने उघड केले नाही. असे दिसते की कृतिकाने आता तिचे नाते अधिकृत केले आहे. क्रिकेट होस्ट आणि टीव्ही प्रेझेंटर गौरव कपूरला डेट करत आहे. कृतिकाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात गौरव कपूरचा एक फोटो आहे
कृतिका कामराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गौरव कपूरसोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिले, ”ब्रेकफास्ट विथ..’ असं कॅप्शन तिने लिहिले आहे. यामध्ये तिने गौरवचा कॅंडीड फोटो आणि स्वत:चा सेल्फी घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या सोबतच तिने ब्रेकफास्ट मेन्यूची झलक दाखवली आहे. यानंतर तिने गौरवसोबत शूजचा फोटो पोस्ट केला आहे. कृतिकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या असून चाहते या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि अभिनेत्रीचे अभिनंदन करत आहेत. कमेंट करत लिहिले, तुम्ही डेट करताय? ओएमजी, दोघंही माझे आवडते सेलिब्रिटी. अश्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर केल्या आहेत.
गौरव कपूर हा दिल्लीचा रहिवासी आहे. तो केवळ क्रिकेट आणि टीव्ही प्रेझेंटर नाही तर टीव्ही अभिनेता देखील आहे. तो त्याच्या इंडियन प्रीमियर लीग प्री-मॅच शो, टी-२० सामन्यांचे कव्हरेज आणि त्याच्या लोकप्रिय यूट्यूब शो “ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स” साठी ओळखला जातो. गौरव कपूरने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात एफएम रेडिओमधून केली आणि नंतर तो चॅनल व्ही वर व्हीजे बनला.
टेलिव्हिजनवर काम करण्याव्यतिरिक्त, गौरव कपूर काही चित्रपटांमध्येही दिसला आहे. त्याने २००३ मध्ये “डरना मना है” या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचे आधी अभिनेत्री आणि मॉडेल किरत भट्टलशी लग्न झाले होते.
कृतिका कामरा काही वर्षांपूर्वी करण कुंद्राला डेट करत होती. दोघांच्या अफेअरची आणि नंतर ब्रेकअपची खूप चर्चा झाली. गेल्यावर्षी कृतिका ग्यारह ग्यारह या सीरीजमध्ये दिसली.