Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मानसी पारेख कॅमेऱ्यासमोर झाली भावुक, राष्ट्रपतींनी खांद्यावर हात ठेवून दिला आधार!

70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 8 ऑक्टोबर 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'कच्छ एक्सप्रेस' या गुजराती चित्रपटासाठी मानसी पारेखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 09, 2024 | 11:05 AM
(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

मानसी पारेख गोहिल ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका, निर्माती आणि कंटेंट क्रिएटर आहे. स्टार प्लस मालिका ‘सुमित संभाल लेगा’ या मालिकेतील माया आणि ‘जिंदगी का हर रंग गुलाल’ या मालिकेतील तिच्या गुलाल या पात्रासाठी ती अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे. अलीकडेच अभिनेत्रीला तिच्या गुजराती चित्रपट ‘कच्छ एक्सप्रेस’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

राष्ट्रपतींनी अभिनेत्रीला दिला आधार
मानसी जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेली तेव्हा ती इतकी भावूक होताना दिसली. अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांचे सांत्वन करताना दिसल्या. खरं तर, 8 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी कलाकारांना गौरविण्यात आले. यादरम्यान, पुरस्कार स्वीकारताना कॅमेऱ्यासमोर पोज देताना मानसी भावुक होऊन रडली आणि पुरस्कार स्वीकारताना दिसली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनेत्रींच्या खांद्यावर हात ठेवून तिला प्रोत्साहन दिले.

 

A well-earned triumph! @manasi_parekh has been honored with the Best Actress in a Leading Role award for “KUTCH EXPRESS (Gujarati)” at the 70th National Film Awards! Her remarkable talent shines through in every scene. @MIB_India @nfdcindia @PIB_India @AshwiniVaishnaw… pic.twitter.com/kK090R0yir

— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) October 8, 2024

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डान्सर मिथुन चक्रवर्ती गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ चित्रपटांमध्ये काम करत आहेत. मानसीसोबत नित्या मेननलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. धनुषच्या थिरुचित्रंबलम या चित्रपटातील अभिनयासाठी नित्याला हा पुरस्कार मिळाला आहे. ऋषभ शेट्टीला कांतारा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

हे देखील वाचा- पायल कपाडियाचा All We Imagine as Light चित्रपटाचा फ्रान्समध्ये दबदबा, 185 चित्रपटगृहांत घातला धुमाकूळ!

नित्या मेननसोबत मानसी पारेख हिलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मानसीला तिच्या 2023 च्या गुजराती चित्रपट ‘कच्छ एक्सप्रेस’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विरल शाह यांनी केले आहे. मानसीशिवाय रत्ना पाठक शाह, धर्मेंद्र गोहिल आणि दर्शील सफारी यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट VI Movies किंवा TV आणि ShemarooMe वर जाहिरातींसह विनामूल्य पाहिला जाऊ शकतो.

Web Title: Manasi parekh gets emotional seen in tears as she receives best actress national award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 11:05 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.