(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
भारतीय चित्रपट All We Imagine as Light या चित्रपटाने भारतीय चित्रपट उद्योग देशाबरोबरच परदेशातही नाव कमावले आहे. अलीकडे, ऑस्कर आणि ग्रॅमी सारखे पुरस्कार जिंकल्यानंतर, भारतीय चित्रपट कान्समध्येही आपले नाव गाजवत आहेत. ऑल वी इमॅजिन ॲज लाइट या भारतीय चित्रपटाला कान्स 2024 मध्ये कान्सचा दुसरा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे. आता हा चित्रपट फ्रान्समध्ये धुमाकूळ घालत आहे.
फ्रान्समध्ये रिलीज झाला चित्रपट
आता पायल कपाडियाच्या या चित्रपटाने फ्रान्सच्या चित्रपटगृहांमध्येही चांगलीच कमाई केली आहे. तेथे या चित्रपटाचे खूप कौतुक झाले असून 185 चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित झाला आहे. कंडोर डिस्ट्रिब्युशन द्वारे वितरीत केलेला हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक आणि समीक्षकांमध्ये पटकन लोकप्रियता या चित्रपटाने मिळवली आहे.
हा चित्रपट फ्रान्समधील उत्कृष्ट भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे. राणा दग्गुबतीच्या स्पिरिट मीडियाने आपला आनंद शेअर करताना म्हटले आहे की, “कान्समध्ये विजय मिळवल्यानंतर आणि समीक्षकांचे प्रेम जिंकल्यानंतर, ऑल वी इमॅजिन ॲज लाइटने फ्रान्समधील प्रेक्षक आणि सिनेप्रेमींची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. भारतातील चित्रपटाच्या पुढच्या प्रवासाबद्दल आम्ही उत्सुक आहोत आणि लवकरच तो भारतात पडद्यावर आणण्यासाठी उत्सुक आहोत. हा चित्रपटाचा भारतातील वितरकही आहे.
हे देखील वाचा- ‘हा’ संगीत दिग्दर्शक आहे बिग बॉस मराठी फेम अंकिताच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉय
काय आहे या चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कथा प्रभा आणि अनु या दोन परिचारिकांची आहे. दोघेही मलियाली असून मुंबईत राहतात. दोघेही आपापल्या नात्यात संघर्ष करताना या चित्रपटामध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत तिसरी स्त्री देखील आहे तिचे नाव पार्वती आहे. संपूर्ण चित्रपटाची कथा यांच्याभोवती फिरते आहे. आजही समाजात स्त्रीची काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. आजही, ती आपले संपूर्ण आयुष्य इतरांची मदत आणि काळजी घेण्यात घालवते आणि त्या बदल्यात काहीही मिळत नाही हे या चित्रपटातून स्पष्ट केले आहे. हा चित्रपट स्त्रीवादी विचारसरणीला बळ देणारा आहे.