
(फोटो सौजन्य - x अकाउंट)
दरवर्षी ११ मे हा दिवस आईला समर्पित असतो. अशा परिस्थितीत, तसेच, बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्याचे त्यांच्या आईवर खूप प्रेम आहे. तसेच ते त्यांच्या आईसाठी आपले प्राण देण्यास देखील तयार आहेत. या अभिनेत्रींनी स्वतःच्या लग्नात महागडे कपडे न निवडता स्वतःच्या आईची साडी परिधान करून त्यांनी त्यांच्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त केले. सोनाक्षी सिन्हा आणि सोनम कपूर व्यतिरिक्त, इतर अनेक अभिनेत्रींची नावे देखील या यादीत समाविष्ट आहेत.
या खास दिवशीही आपल्या आईच्या भावना सोबत घेऊन जाणाऱ्या या सुंदरींनी आपल्या लग्नाच्या लुकने सर्वांनाच टक्कर दिली. काही अभिनेत्रींनी आईची साडी नेसली होती, तर काहींनी त्यांच्या आईचे दागिने घातले होते. आणि जेव्हा त्या वधूच्या रूपात सर्वांसमोर आल्या तेव्हा सर्वजण या अभिनेत्रींकडे पाहत राहिले. या अभिनेत्रींचे लग्नाचे फोटो खूप व्हायरल झाले आहे चाहत्यांना खूप आवडले.
‘किंमत मोजावी लागेल…’, कन्नड चित्रपट निर्माते सोनू निगमवर संतापले, घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
यामी गौतमचा खास ब्राइडल लुक
यामी गौतमने तिच्या आईची बनारसी सिल्क साडी तिच्या लागणार परिधान केली होती. ती चमकदार लाल साडीत खूप सुंदर दिसत होती. साडीवरील ब्रोकेड वर्क आणि जाड सोन्याच्या बॉर्डरमुळे अभिनेत्रीचा वधूचा लूक खास बनला. यासोबतच, अभिनेत्रीने एक सुंदर ब्लाउज देखील परिधान केला होता. यामीने लग्नात पारंपरिक पद्धतीत साडी परिधान केली होती दागिन्यांनी अभिनेत्रीने स्वतःचा लुक परिपूर्ण केला.
सोनाक्षी सिन्हाने देखील नेसली आईची साडी
सोनाक्षी सिन्हाने वधू बनण्यासाठी वेगळा लूक निवडला. ना लेहेंगा ना लाल रंगाची साडी, अभिनेत्रीने आई पूनमची ४५ वर्ष जुनी विंटेज साडी नेसली होती. क्रीम-पांढऱ्या रंगाच्या साडीवरील बारीक चिकनकारी नक्षीने अभिनेत्रीचा लूकला एक शाही टच दिला होता. तिने साडीला शोभेल असा एक मॅचिंग ब्लाउज देखील परिधान केला होता. सोनाक्षीने साडीसोबत तिच्या आईचे दागिनेही घातले होते. ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि मोहक दिसत होती.
सोनम कपूरनेही जिंकले मन
सोनम कपूरच्या लग्नासाठीचा लेहेंगा अनुराधा वकील यांनी डिझाइन केला होता, परंतु तिने घातलेले दागिने तिची आई सुनीता कपूर यांनी डिझाइन केले होते. तिच्या लेहेंग्यावर जाड बॉर्डर आणि फुलांचे नक्षीदार केले होते. तसेच अभिनेत्रीने साडीवर सुंदर ओढणी देखील परिधान केली होती.अभिनेत्रीने सुंदर मेकअप आणि दागिन्यांसह स्वतःचा लुक परिपूर्ण केला होता. तसेच अभिनेत्रीला पाहून सगळे चकित झाले होते.
कीर्ती सुरेशने देखील नेसली आईची साडी
कीर्ती सुरेशने लग्नासाठी तिची आई मेनकाची ३० वर्ष जुनी साडी निवडली. डिझायनर अनिता डोंगरे यांनी जुन्या साडीला एक नवीन टच दिला. या गडद लाल रंगाच्या साडीवर चांदीच्या जरीचे भरतकाम केले होते. ज्यामुळे ती साडी आणखी आकर्षित दिसत होती. अभिनेत्रीने स्वतःचा लुक आणखी खास बनवण्यासाठी तिने गोल नेकलाइनसह मॅचिंग ब्लाउज घातला होता. या सगळ्या अभिनेत्रीने स्वतःच्या लग्नात आईची साडी निवडून त्याच्या आईला खास वाटवून देण्याची त्यांची पद्धत खूपच प्रभावी आहे.