(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
देशातील अलीकडील घटना आणि सुरक्षितता लक्षात घेऊन, मॅडॉक फिल्म्स आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांचा आगामी कौटुंबिक मनोरंजक चित्रपट ‘भूल चुक माफ’ जो ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, तो आता १६ मे रोजी देशभरात थेट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची योजना निर्मात्यांनी आखली होती, परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता निर्मात्यांनी हे जबाबदार पाऊल उचलले आहे. आता हा निर्णय निर्मात्यांनी का घेतला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
‘भूल चुक माफ’ चित्रपटाचे निर्माते या निर्णयाबद्दल म्हणाले की, ‘आम्ही सर्वजण हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होतो. सिनेमात एकत्र हसण्याची, टाळ्या वाजवण्याची आणि आनंद साजरा करण्याची अपेक्षा होती. पण जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि लोकांच्या कल्याणाचा विचार येतो तेव्हा इच्छांपेक्षा वर जाणे महत्त्वाचे असते. ‘राष्ट्राची भावना प्रथम येते.’ अशा वेळी, हा निर्णय केवळ शहाणपणाच नाही तर योग्य विचारसरणीचेही प्रतिबिंबित करतो.’ असे ते म्हणाले.
मनोरंजनात कोणतीही तडजोड नाही
जरी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नसला तरी त्याचे मनोरंजन करण्याची क्षमता जास्तच असणार आहे. ‘भूल चुक माफ’ ही एक हलकीफुलकी, हृदयस्पर्शी कौटुंबिक मनोरंजक कथा आहे, ज्यामध्ये नातेसंबंध, प्रेम आणि मानवी कमतरता सुंदरपणे चित्रित केल्या आहेत. आता प्रेक्षक हे तुमच्या कुटुंबासह घरी पाहू शकता, तेही गर्दीशिवाय. असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मची ताकद
या निर्णयातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की आज डिजिटल प्लॅटफॉर्म केवळ एक पर्याय नसून एक माध्यम बनले आहे. आता चित्रपटांची पोहोच काही विशिष्ट शहरांपुरती मर्यादित राहिली नसून ती आता जगभरातील लोकांपर्यंत पोहचली आहे. १६ मे रोजी ‘भूल चुक माफ’ प्रदर्शित होईल तेव्हा तुम्ही भारतात असाल किंवा परदेशात, हा चित्रपट तुम्हाला फक्त एका क्लिकवर ओटीटी उपलब्ध असणार आहे. चित्रपटाच्या टीमने दाखवून दिले आहे की खरी देशभक्ती शब्दांमध्ये नाही तर निर्णयांमध्ये असते.
‘महाभारत’मधील कोणते पात्र साकारणार आमिर खान? म्हणाला- ‘मी त्यांच्यापासून प्रेरित…’
चित्रपटातील कलाकार
‘भूल चुक माफ’ हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी आहे, ज्यामध्ये राजकुमार राव आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात राजकुमार राव रंजनची भूमिका साकारत आहे, जो एक साधा आणि सरळ तरुण आहे, तर वामिका गब्बी रंजनसोबतच्या नात्यात अडकलेल्या तितली मिश्राची भूमिका साकारत आहे. याशिवाय, चित्रपटात सीमा पाहवा रंजनची आई रामवती आणि संजय मिश्रा भगवान दासच्या भूमिकेत सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.