(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कलर्सचा लोकप्रिय कुकिंग शो ‘लाफ्टर शेफ्स २’ बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांच्या मागणीमुळे हा शो काही आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. यासोबतच, मागील हंगामातील करण कुंद्रा, निया शर्मा, अली गोनी आणि रीम शेख यांसारखे स्पर्धक पुन्हा एकदा या शोमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस १७’ चा विजेता आणि कॉमेडियन मुनव्वर फारुकी देखील ‘लाफ्टर शेफ्स २’ मध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे. एवढेच नाही तर शोमध्ये येताच त्याने एल्विश यादवची जागा घेतली. ही संपूर्ण माहिती सेटच्या जवळच्या एका सूत्राने सांगितली आहे.
एल्विश यादवला नाही करता येणार शूट
इंडिया फोरम्सच्या एका विशेष अहवालानुसार, स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी भारती सिंगच्या ‘लाफ्टर शेफ्स २’ शोमध्ये सामील झाला आहे. सेटवरील एका सूत्राने सांगितले की, वेळापत्रकाच्या अडचणींमुळे, एल्विश यादव सध्या भागाचे चित्रीकरण करू शकत नाही, त्यामुळे निर्मात्यांनी शोमध्ये मुनव्वर फारुकीला घेतले आहे. याचा अर्थ असा की ही बदली फक्त एका ट्विस्टमुळे करावा लागला आहे.
Badshah: पहलगाममधील क्रूर हल्ला पाहून बादशाहचे तुटले हृदय, रॅपरने संगीत लाँचची डेट ढकलली पुढे!
एल्विश दोन इतर शोमध्ये दिसणार आहे
एल्विश यादव आजकाल अनेक शोमध्ये दिसतो आहे. एकीकडे, तो ‘लाफ्टर शेफ्स २’ मध्ये दिसणार असल्याचे समजले आहे, तर दुसरीकडे, त्याने ‘एमटीव्ही रोडीज डबल क्रॉस’ मध्ये ग्रुप लीडरची भूमिका केली आहे. याशिवाय, एल्विशचा गेम शो ‘इंडियन गेम अड्डा’ देखील जिओ हॉटस्टारवर प्रसारित होत आहे. असे अनेक शो मध्ये प्रेक्षकांना मनोरंजन करताना दिसणार आहे.
फवाद-हानियासारख्या सेलिब्रिटींना धक्का, FWICE ने पाकिस्तानी कलाकारांवर घातली बंदी!
मुनव्वर सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये दिसला होता
‘लाफ्टर शेफ्स २’ च्या आधी, कॉमेडियन मुनावर फारुकी सोनी टीव्हीच्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कुकिंग शोमध्ये दिसला होता. शोच्या शेवटच्या आठवड्यात तो एका दिवसासाठी पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. यादरम्यान, मुनावरने शोचा विजेता गौरव खन्ना याच्यावर डिश कॉपी केल्याचा आरोपही केला. त्यानंतर गौरवने स्पष्ट केले की शो दरम्यान प्रत्येकजण स्वतःचे पदार्थ स्वतः बनवतो. तसेच, आता ‘लाफ्टर शेफ्स २’ मध्ये मुनव्वर फारुकी कोणते चमत्कार दाखवतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.