(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर दक्षिणेतील अभिनेता नागा चैतन्यने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत 8 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. हे कपल गेल्या एक वर्षापासून डेट करत होते, मात्र या दोघांनी कधीही मीडियासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. नागा चैतन्यचे वडील अक्किनेनी नागार्जुन यांनी आपल्या मुलाच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. एंगेजमेंटनंतर या जोडप्याच्या लग्नाबद्दल चाहते खूपच उत्सुक दिसत आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की दोघे लग्न कधी करणार आहेत. आता बुधवारी या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेबाबत एक अपडेट समोर आली आहे.
जोडपं पुढच्यावर्षी अडकणार लग्न बंधनात
रिपब्लिक वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, हे जोडपे या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहेत किंवा पुढच्या वर्षी मार्च महिन्यात सात फेरे घेण्याची तयारी करत आहेत. दोघेही डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी देशातच नव्हे तर परदेशातही जागेचा शोध सुरू झाला आहे. आणि याचीच तयारी हे दोघेही करत असल्याचे समोर आले आहे.
जोरात सुरु आहे लग्नाची तयारी
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. लग्नाचे ठिकाण निवडण्यासाठी या जोडप्याने हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये टीमची व्यवस्था केली आहे. तथापि, कुटुंब किंवा जोडप्याकडून या बातम्यांना दुजोरा मिळालेला नाही.
हे देखील वाचा- Engaged! नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाच्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर, सोभिताचा सोबर आणि सुंदर लुक
अक्किनेनी नागार्जुनने लग्नाबाबत सोडले मौन
जोडप्याच्या एंगेजमेंटनंतर लगेचच, अक्किनेनी नागार्जुनने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सोभितासोबत आपल्या मुलाच्या लग्नाच्या योजनांबद्दल खुलासा केला होता. ते म्हणाले, “अजून नाही.” शुभ दिवस असल्याने आम्ही घाईघाईत एंगेजमेंट करण्याचा निर्णय घेतला, पण कोणीही घाई लग्नासाठी होणार नाही”. असे त्यांनी सांगितले. याचदरम्यान आता लवकरच हे जोडपं लग्न बंधनात अडकणार असून, या दोघांनाही आनंदात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.