(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज विवाहबंधनात अडकणार आहेत. हे जोडपे आज वधू-वर होणार असून नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. प्रत्येकाला या जोडप्याच्या लग्नाच्या तपशीलांमध्ये खूप रस आहे. आता तो दिवस आला आहे, तर जाणून घेऊया नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचे लग्न आज किती वाजता सुरु होणार आहे? आता त्यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त समोर आला आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला किती वाजता लग्न करणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज रात्री सुमारे 8:15 वाजता कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न करणार आहेत. या सेलिब्रिटी लग्नात पाहुणे म्हणून उपस्थित राहणाऱ्यांची नावेही समोर आली आहेत. पाहुण्यांच्या यादीत जवळच्या कौटुंबिक मित्रांचा समावेश असेल. महेश बाबू, अल्लू अर्जुन आणि राम चरण, नयनतारा, ज्युनियर एनटीआर यांच्यासह बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू, अक्किनेनी आणि दग्गुबती कुटुंबातील सदस्यही लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
लग्नानंतर नागा आणि शोभिता मंदिरात जाणार आहेत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचे लग्न अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये 8 तास चालणार आहे. लग्नाचे सर्व विधी पूर्ण होताच नवविवाहित जोडपे प्रथम मंदिरात जाऊन पुढील सुंदर प्रवासासाठी आशीर्वाद घेणार असल्याचेही सांगितले जात आहे. नागा आणि शोभिता ‘तिरुपती बालाजी मंदिर’ किंवा ‘श्रीशैलम मंदिर’ ला भेट देऊ शकतात. नागार्जुनने लग्नापूर्वीच सुमारे अडीच कोटी रुपयांची मरून लेक्सस एलएम एमपीव्ही कार खरेदी केली आहे. त्यांचा मुलगा नागा चैतन्य आणि सून शोभिता धुलीपालासाठी ही लग्नाची भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘पुष्पा 2’ मधील खलनायक फहाद फासिलचे बॉलीवूडमध्ये पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीसह करणार रोमान्स!
चाहते लग्नाच्या फोटोंची वाट पाहत आहेत
आता चाहत्यांना या जोडप्याच्या लग्नाच्या फोटोंची प्रतीक्षा आहे. हे दोघे अधिकृतपणे पती-पत्नी कधी होणार आणि त्याची घोषणा केव्हा होणार हे सगळ्यांनाच बघायचे आहे. नागाने लग्नाला दुसरी संधी दिली असून तो दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आणखीनच खास बनली आहे. नागा आणि शोभिताच्या चाहत्यांशिवाय समांथाचे चाहतेही लग्नाच्या पोस्टसाठी जोडप्याच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत.