
Neha Dhupia (फोटो सौजन्य- Instagram)
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने नुकताच तिच्या संघर्षाबद्दल खुलासा केला आहे. 22 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतरही नेहा चित्रपटसृष्टीत चाहत्यांच्या मनात कायमस्वरूपी स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. ती चांगल्या चित्रपटाच्या आणि भूमिकेच्या शोधात आहे. अभिनेत्री म्हणाली की, तिला शेवटच्या वेळी हिंदी चित्रपटाची ऑफर कधी आली हेही आठवत नाही आहे. आता याच बद्दल या अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
नेहा धुपियाने 2003 मध्ये “कयामत: सिटी अंडर थ्रेट” या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तरीही तिला योग्य ती ओळख चाहत्यांमध्ये मिळाली नाही असे तिने सांगितले आहे. तसेच अनेकदा आपल्या टॅलेंटनुसार काम मिळत नाही असे देखील ती म्हणाली आहे.
नेहा 22 वर्षांपासून करतेय संघर्ष
नेहा धुपियानेही खुलासा केला की, तिला बॉलीवूडमधून ऑफर्स मिळत नसल्या तरी तिला साऊथमधून काम करण्याची संधी मिळत आहे. बॉलीवूड हंगामासोबतच्या मुलाखतीदरम्यान, अभिनेत्री म्हणाली, “मी अशा ठिकाणाहून आले आहे जिथे मी सिनेमाच्या मनोरंजक भागाशी जोडण्यासाठी 22 वर्षांपासून संघर्ष करत आहे. काही वेळा माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतात.” असे ती म्हणाली आहे.
काम करणे आवश्यक आहे
ती पुढे म्हणाली की, “कसे कोणीतरी येऊन म्हणतं, ‘अहो, ते छान होतं’ किंवा ‘यामधलं तुझं काम आम्हाला आवडलं’, ‘अरे, यामध्ये तू खूप छान काम केला आहेस, आपण एकत्र काम करू शकतो’ या सगळ्यामुळे तुमच्या कामात वेगळा बदल घडून येतो, काम चांगले असेल तर ते प्रेक्षकांना भरपूर आवडते, त्यामुळे स्वतःचे काम तपासून पाहणे जास्त गरजेचे असते.” असे तिने सांगितले.
नेहाला साऊथ चित्रपटातील मिळाल्या ऑफर्स
साऊथ चित्रपटांच्या ऑफर्सबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मला साऊथमधून चित्रपटाची ऑफर आली आहे, ही ऑफर मी कशी स्वीकारावी हे मला माहित नाही, कारण मला या इंडस्ट्रीबद्दल जास्त माहिती नाही, पण मला साऊथ चित्रपटांमध्ये काम करायचे आहे, हे करायला मला खूप आवडेल आणि गेल्या तीन महिन्यांत सलग दोन ऑफर मिळाल्या आहेत.” असे तिने या मुलाखतीत सांगतिले आहे. नेहाने साऊथ चित्रपटांमध्ये काम करायची उच्च व्यक्त केल्यामुळे ती आता खरंच या सिनेमाइंडस्ट्री मध्ये दिसणार का याची चाहत्यांना आशा आहे.
हे देखील वाचा- आमिर खानच्या घटस्फोटानंतर किरण राव आहे आनंदी, म्हणाली- ‘मला अजिबात एकटं वाटत नाही’!
सिनेमाइंडस्ट्रीचे चुकले गणित
हिंदी चित्रपटांच्या न मिळालेल्या ऑफर्समुळे निराशा व्यक्त करत नेहा म्हणाली, “माझ्याकडे शेवटच्या वेळी हिंदी चित्रपटाची ऑफर कधी आली हे मला आठवत देखील नाही. माझा फोन वारंवार का वाजत नाही, हे मलाही कळत नाही. या सिनेमाइंडस्ट्रीच्या टप्प्यातून जाणे खरोखर कठीण आहे, त्यामुळे मी दरवाजे ठोठावतो, जे मी नेहमी करते आणि मला वाटते की तेथे जाऊन काम मागणे काही चुकीचे नाही, आणि तुम्ही काही चुकीचे करत नाही आहात. कारण मला वाटते जे लोक काम देतात. त्यांनासुद्धा अनेकदा प्रत्येक गोष्टींचा संघर्ष करावा लागतो, या इंडस्ट्री मधील गणित जमले नाही की, त्यांनादेखील खूप मेहनत घ्यावीची लागते. कधी कधी तर स्क्रिप्टशिवाय त्यांना चित्रपट बनवावा लागतो. आणि ही स्क्रिप्ट पैशाची एक्सेल शीट असते आणि ते गणित जमवून आलेच नाही, तर मग तुम्ही कोणाकडे जाल? असे तिने या सिनेमासृष्टीतील नेमके काय गंमत आणि या इंडस्ट्रीमध्ये कोणती मेहनत घ्यावी लागते हे स्पष्ट सांगितले.