(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध लेखक आणि अभिनेता पीयूष मिश्राने अनिराग कश्यपसोबत गुलाल आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत पीयूष मिश्राने अनुराग कश्यपच्या ‘गुलाल’ चित्रपटावर त्यांच्यासमोरच जोरदार टीका केली आहे.
एका मुलाखतीत बोलताना पीयूष मिश्रा म्हणाला “गुलाल… मला अनुरागला माफ कर, पण मला माहित नाही की त्याच्या दुसऱ्या भागाचे काय झाले. त्याची समस्या अशी आहे की तो पहिला भाग चांगला बनवतो, नंतर त्याला वाटते की तो एक चांगला चित्रपट बनवत आहे आणि तो जाणूनबुजून तो खराब करतो. त्याने दुसरा भाग खराब केला. गुलाल एक चांगला चित्रपट बनत होता, पण त्याने तो खराब केला.”
यादरम्यान अनुराग कश्यप फक्त हसत राहिला, परंतू त्यांच्या हावभावांमुळे त्यांना थोडे अस्वस्थ वाटत असले तरी त्यांनी पियुष मिश्राने विनोदी पद्धतीने उत्तर दिले. यावेळी त्यानेही थोड्या मजेशीर शैलीत पीयूष मिश्राला प्रत्युत्तर दिलं. तो म्हणाला, “याच्यात एक समस्या आहे. याच्यासोबत नेहमी एक अदृश्य हार्मोनियम चालू असतो. हा जसा बोलतो, तसं वाटतं की हार्मोनियम वाजवतायत”
दिलीप प्रभावळकरांचा ‘दशावतार’ प्रेक्षकांच्या पसंतीस, दुसऱ्या दिवसाची कमाई कोटींमध्ये!
याआधी एका मुलाखतीत पीयूष मिश्राने सांगितलं होतं की, ‘गुलाल’ चित्रपट त्याने केवळ अनुराग कश्यपला सपोर्ट करण्यासाठी केला होता. त्या चित्रपटासाठी त्याने अतिशय कमी मानधन घेतलं होतं.
या चित्रपटातील त्यांचं ‘आरंभ है प्रचंड’ हे गाणं प्रचंड गाजलं आणि आजही ते एक आयकॉनिक गीत मानलं जातं.पण बॉक्स ऑफिसवर मात्र चित्रपट फारसा चालला नाही.या चित्रपटात राज सिंग चौधरी, के के मेनन, अभिमन्यू सिंह, दीपक डोबरियाल, आयशा मोहन, आणि आदित्य श्रीवास्तव यांसारखे उत्तम कलाकार झळकले होते.
देवों के देव महादेव’ फेम सोनारिका भदोरिया होणार आई; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केले फोटोशूट
अनुराग कश्यपच्या चित्रपटावर टीका
मनोज बाजपेयी यांचा ‘जुगनुमा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हिमालयीन पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झालं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते राम रेड्डी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मनोज बाजपेयी, पियुष मिश्रा आणि अनुराग कश्यपने एका मीडिया हाऊसला मुलाखत दिली. यामध्ये पियुष मिश्राने सर्वांसमोर ‘गुलाल’ चित्रपटावर टीका केली आहे.