फोटो सौजन्य - Social Media
‘पुष्पा २’च्या प्रीमिअर शोदरम्यान हैदराबादमधील एका चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन प्रेक्षकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणी कमी होत नसताना रविवारी सायंकाळी त्याच्या घरासमोर घराबाहेर तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी ८ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी रविवारी सायंकाळी अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरी निदर्शने केली. अल्लू अर्जुनने महिलेच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत द्यावी आणि कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करावी अशी मागणी आंदोलकांंनी केली आहे. आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जेएसीच्या नेत्यांना ताब्यात घेतलं. याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवेळी अल्लू अर्जुन त्याच्या घरी उपस्थित नव्हता.
अल्लू अर्जुनची मुले अयान आणि अरहा यांना हैदराबादमधील जुबली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासांनी सुरक्षितपणे या दोघांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. रविवार, 22 डिसेंबर रोजी उस्मानिया विद्यापीठातील आठ जणांनी अभिनेत्याच्या घरावर तोडफोड केली होती. यावेळी त्यांनी अल्लू अर्जुनचा पुतळा जाळला, झाडाची कुंडी फोडली आणि निषेध केला. यानंतर पोलिसांनी या घटनेत सहभागी आठ जणांना अटक केली आहे.
Allu Arjun’s kids (Arha & Ayaan) whisked away from the house after attacks today! pic.twitter.com/iu5N5UFZ3Q
— idlebrain.com (@idlebraindotcom) December 22, 2024
अल्लू अरविंद यांनी प्रतिक्रिया दिली
हल्ल्याच्या वेळी अल्लू अर्जुन घरी नव्हता. हल्ल्यानंतर अभिनेत्याची मुले अल्लू अरहा आणि अल्लू अयान घरातून बाहेर पडताना दिसले. आपल्या घराबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अल्लू अरविंद म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडले ते सर्वांनी पाहिले, परंतु आता योग्य प्रतिक्रिया देण्याची वेळ आली आहे. मी ही प्रतिक्रिया देण्याची योग्य वेळ मानत नाही. लोकांनी तोडफोड केली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आमच्या घराजवळ पोलिस तैनात करण्यात आले आहेत जेणेकरून कोणीही अशा घटनांना प्रोत्साहन देऊ नये.” असे अभिनेत्याचे वडील अल्लू अरविंद यांनी सांगितले आहे.
अनेक वर्षांपूर्वी सलमान खानने दिलेला ‘तो’ सल्ला आजही अर्जुन कपूरच्या आठवणीत…
रेवंत रेड्डी यांनी या हल्ल्याचा निषेध केला
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेचा निषेध केला असून पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “चित्रपट व्यक्तींच्या घरांवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. मी राज्याचे डीजीपी आणि शहर पोलिस आयुक्तांना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश देतो. या प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. संध्या थिएटरच्या घटनेमुळे असंतुष्ट झालेल्या पोलिसांची यावर प्रतिक्रिया येणार नाही याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.” असे त्यांनी सांगितले.