(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
१२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘रांझणा’ या चित्रपटाने लोकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. धनुष आणि सोनम कपूर अभिनीत हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स जुन्या क्लायमॅक्सपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. खरंतर चित्रपटाचा क्लायमॅक्स एआय द्वारे बदलण्यात आला आहे. आता चाहते देखील याबद्दल दोन भागात विभागले गेले आहेत. काही जण ते चांगले म्हणत आहेत, तर काही खूप रागावले आहेत. अलीकडेच चित्रपटातील मुख्य अभिनेता धनुषची प्रतिक्रियाही समोर आली आहे. तो या नवीन क्लायमॅक्सवर खूप नाराज असल्याचे दिसून येत आहे. धनुषने सोशल मीडियावर लांबलचक नोट देखील शेअर केली आहे.
धनुषची नोट सोशल मीडियावर व्हायरल
२०१३ मध्ये आलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या ‘रांझणा’ चित्रपटाशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्याची कथा, गाणी, अभिनय आणि क्लायमॅक्स प्रेक्षकांना खूप आवडले. चित्रपटाचा शेवट हा चित्रपटाचा आत्मा होता. आता जेव्हा हा चित्रपट १२ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याचा क्लायमॅक्स पाहून धनुषही अस्वस्थ झाला आहे. त्याने त्याच्या एक्स अकाउंटवर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. आणि चाहत्यांना महत्वाचा संदेश दिला आहे.
For the love of cinema 🙏 pic.twitter.com/VfwxMAdfoM
— Dhanush (@dhanushkraja) August 3, 2025
धनुषने नोटमध्ये काय लिहिले?
धनुषने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘एआयने क्लायमॅक्स बदलून ‘रांझणा’ चित्रपटाचे पुन्हा प्रदर्शन केल्यामुळे मला खूप वाईट वाटले आहे. या नवीन शेवटामुळे चित्रपटाचा गाभा हिरावून घेतला आहे. माझ्या आक्षेपाला न जुमानता हा प्रदर्शित करण्यात आला आहे, जो खूप चुकीचा आहे. हा चित्रपट मी १२ वर्षांपूर्वी ज्या चित्रपटाशी जोडलेला होता तो नाही. एआय वापरून चित्रपटांमध्ये बदल करणे कला आणि कलाकारांचा अपमान आहे आणि चित्रपटाच्या वारशासाठी देखील धोकादायक आहे. भविष्यात अशा गोष्टींवर कडक बंदी घालण्यात येईल अशी आशा आहे.’ असे म्हणून धनुषने ही पोस्ट शेअर केली आहे.
‘फक्त शिक्षणच तोडू शकेल हुकूमशाहीच्या साखळ्या…’, कमल हासनने केंद्र सरकारवर साधला निशाणा
चित्रपटात बदल केल्यामुळे अभिनेत्याचा संताप
धनुष व्यतिरिक्त, चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल रॉय यांनीही यावर आक्षेप घेतला आहे. ‘रांझणा’ चित्रपटात कुंदनची भूमिका साकारणारा धनुष शेवटी मरतो, परंतु पुन्हा प्रदर्शित होताना त्याचे पात्र एआय द्वारे जिवंत करण्यात आले आहे. या शेवटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. धनुषसोबत, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि मोहम्मद झीशान अय्युब या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले आहेत.