(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
लोकप्रिय टीव्ही मालिका ‘राधा कृष्ण’ मधील कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमेध मुदगलकर याच्याबद्दल चिंताजनक बातमी चाहत्यांसाठी समोर आली आहे. सुमेधच्या कृष्णाच्या भूमिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आणि त्याचे वेडे चाहत्यांना लागले. अभिनेत्याला आणि त्याच्या भूमिकेला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले. आणि आता अभिनेत्याने जखमी होताच नाकाचे हाड तुटल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती कशी आहे, याची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे.
अभिनेता सुमेध मुदगलकरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. एका प्रोजेक्टच्या ॲक्शन सीनचे शूटिंग करताना त्याच्या नाकाचे हाड तुटल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे. अभिनेत्याची हा अपघात गंभीर असल्यामुळे अभिनेत्याला ऑपरेशन करावे लागले आहे. त्याने लिहिले, ‘घाबरण्याची गरज नाही. कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. काही आठवड्यांत मी ठिक होईल.’ असे लिहून त्याने चाहत्यांच्या मनातील काळजी कमी केली आहे.
हे देखील वाचा – भूल भुलैया 3 आणि सिंघम अगेन दोन्ही चित्रपटांमध्ये कडवी टक्कर! जाणून घ्या विकेंडचे कलेक्शन
सुमेधच्या चेहर्यावरील दिसली पट्टी
पोस्टच्या शेवटी, सुमेधनने स्वतःचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्याभोवती पट्टी बांधलेली दिसत आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे अभिनेत्याने आभार देखील मानले आहे. सुमेध मुदगलकरच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ निगम, सुंबुल तौकीर आणि शंतनू माहेश्वरी यांसारख्या सेलिब्रेटींनी सुमेधला काळजी घेण्यास सांगितले आहे. त्याच्या चाहत्यांनी देखील काळजी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा – राजपाल यादव पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले अन् केले असे कृत्य… व्हिडिओ झाला व्हायरल!
सुमेधने ‘राधा कृष्ण’ या मालिकेनंतर भरपूर प्रसिद्धी मिळवली. खूप कमी वयात हा अभिनेता चाहत्यांमध्ये चमकू लागला आणि त्याची फॅन फोल्लोविंग देखील सोशल मीडियावर वाढू लागली. लवकरच मराठी चित्रपटात हा अभिनेता झळकणार आहे. तो चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेतील शुशिमच्या भूमिकेसाठी देखील ओळखला जातो. अभिनेता असण्याबरोबरच तो उत्कृष्ट डान्सर देखील आहे. त्याने ‘डान्स इंडिया डान्स सीझन ४’ मध्ये सहभागी झाला होता. आणि इथून अभिनेत्याच्या करिअरला सुरुवात झाली. तसेच तो लवकरच आता ‘मन येड्यागत झालं’ या मराठी चित्रपटात झळकणार असून, चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.