राधिका मर्चंटचे वाढदिवसाचे खास फोटोवर टाका एक नजर
राधिका मर्चंट तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनंतला केक भरवताना दिसली आहे. यावेळी राधिकावर सासू आणि सासऱ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. राधिकाचा फोटोमधील लुक खूपच अप्रतिम दिसत आहे.
जान्हवी कपूरनेही या पार्टीत हजेरी लावली होती. जान्हवी कपूरच्या लूकवर सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. या फोटोमध्ये जान्हवी कपूर तिच्या खास मित्र ओरीसोबत पोज देताना दिसली आहे.
अनन्या पांडेही तिची मैत्रिण राधिका मर्चंटचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सहभागी झाली होती. यावेळी अनन्या पांडे पूर्ण देसी लूकमध्ये दिसली. तिने हिरणव्या रंगाची साडी परिधान केली होती.
राधिका मर्चंटचा वाढदिवस खास बनवण्यासाठी एमएस धोनीही आला होता. या पार्टीत एमएस धोनीने ग्रीन व्हाइट रंगाचा शर्ट घातला होता. त्याच्यासोबत ओरी पोज देताना दिसला आहे.
राधिका मर्चंटने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत सिल्व्हर रेड कलरचा सुंदर पोशाख परिधान केला होता. तसेच राधिकाने हातात हिऱ्याच्या अंगठीने घातली होती ज्यावर सर्वांचे लक्ष वेधूले होते.
आता राधिका मर्चंटच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ओरी राधिका मर्चंटची वाहिनी आणि नणंदसोबत पोज देताना दिसला आहे.