(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज २२ ऑक्टोबरला वाढदिवस साजरा करत आहे, आणि यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी खूपच खास ठरला आहे. कारण ती पहिल्यांदाच आई झाल्यानंतरचा वाढदिवस साजरा करत आहे.या खास प्रसंगी तिचा पती राघव चड्ढा याने तिला अतिशय प्रेमळ पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट करून परिणीतीसाठी भावना व्यक्त केल्या आहेत.
राघवने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं,”वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, ‘बेस्टेस्ट मम्मी’ , प्रेयसीपासून पत्नी आणि आता आपल्या लहान मुलाची आई होण्यापर्यंतचा हा प्रवास खरंच अद्भुत होता!”
राघव चड्ढाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर परिणीतीसोबतच्या काहीअतिशय खास आणि हृदयस्पर्शी फोटोंचा संग्रह शेअर केला आहे.
या फोटोंमध्ये परिणीतीने ऑरेंज रंगाचा सुंदर सूट घातलेला असून, ती आपल्या बेबी बंपसोबत आनंदाने पोझ देताना दिसते आहे.काही फोटोंमध्ये दोघेही व्हाईट शर्ट आणि टी-शर्टमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहेत.
अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने १९ ऑक्टोबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी राघव चड्ढा याने स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली होती.
जावेद अख्तर मुस्लिमांबाबत असं काय म्हटलं की संतापला लकी अली?, म्हणाला,”तो माणूस ओरिजिनल नाही..”
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघं २४ सप्टेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकलं,त्यांचा उदयपूरमध्ये एक भव्य विवाहसोहळा पार पाडला. पारंपरिक पद्धतीने आणि राजेशाही थाटात झालेल्या या लग्नात त्यांच्या कुटुंबीयांसह बॉलिवूड आणि राजकारण क्षेत्रातील काही खास पाहुण्यांनीही हजेरी लावली होती.