(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात दिलेल्या ‘हिंदू-मुस्लिम’ संबंधी वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर ते सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले, आणि यावर गायक लकी अली याने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
त्या व्हिडिओखाली लकी अली याने ‘एक्स’ अकाउंटावर वर टिप्पणी केली “जावेद अख्तरसारखे बनू नका, तो कधीच ओरिजिनल नव्हता आणि दिसायलाही अग्ली अॅज F**k…”ही टिप्पणी काही क्षणांतच व्हायरल झाली आणि इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली.
‘ओ सनम’ या प्रसिद्ध गीताचे गायक लकी अली याने अलीकडेच एका ‘एक्स’ (पूर्वी ट्विटर) वापरकर्त्याच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या पोस्टमध्ये जावेद अख्तर यांचे एक वादग्रस्त विधान शेअर केले होते, ज्यात त्यांनी हिंदूंना मुसलमानांसारखे न होण्याचा सल्ला दिला होता.
जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यात शोले चित्रपटातील यूं की ये कौन बोला या संवादाचा उल्लेख आहे. त्याबाबत जावेद अख्तर म्हणतात की शोले चित्रपटात एक प्रसंग होता त्यात धर्मेंद्र शंकराच्या मूर्तीच्या मागे लपून बोलत असतात. हेमा मालिनी यांना वाटतं की भगवान शंकर बोलत आहेत. मी आज असा सीन लिहू शकणार नाही. १९७५ मध्ये हिंदू नव्हते का? की तेव्हा लोक धार्मिक नव्हते का? तर होते. असं जावेद अख्तर म्हणाले होते.
जावेद अख्तर पुढे म्हणतात की, ते पुण्यात राजू हिरानीसह एका मोठ्या प्रेक्षकांच्या समोर म्हणाले होते,“मुस्लिमांसारखं बनू नका. त्यांना तुमच्यासारखं बनवा. तुम्ही मुस्लिमांसारखे होत आहात ही एक वेदना आहे.”जावेद अख्तर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि परखडपणासाठी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर तिरस्कार करणाऱ्यांनाही त्यांनी नेहमी तिखट उत्तरं दिली आहेत.
Annu Kapoor: अन्नू कपूर यांनी व्यक्त केली शेवटची इच्छा, म्हणाले – “माझा मृत्यू सणासुदीत झाला तर…”
या पार्श्वभूमीवर, लकी अलीने या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत जावेद अख्तर यांना ओरिजनल माणूस न ठरल्याचं म्हटलं आहे. लकी अली म्हणाले,“जावेद अख्तरसारखे बनू नका, तो कधीच ओरिजिनल नव्हता आणि दिसायलाही अग्ली अॅज Fk…”**