(फोटो सौजन्य - x अकाउंट)
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा ‘रेड २’ हा चित्रपट १ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात वाणी कपूर देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बऱ्याच काळानंतर, अमेय पटनायक या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. यावेळी तो एका नवीन रेडसह प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला आहे, ज्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, ‘रेड ३’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबतही निर्मात्यांनी अपडेट दिले आहेत. निर्मात्यांनी पुष्टी केली आहे की या फ्रँचायझीवरील काम अद्याप संपलेले नाही.
मेलबर्न कॉन्सर्टमध्ये नेहा कक्करने रडायचे केले होते नाटक? आयोजकांनी केला धक्कादायक खुलासा!
‘रेड ३’ बाबत समोर आले अपडेट
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, निर्माते भूषण कुमार आणि कुमार मंगत यांनी इंडिया टुडेशी केलेल्या विशेष संभाषणात ‘रेड’ फ्रँचायझीबद्दल बोलले. भूषण कुमार म्हणाले की, सिक्वेलची कल्पना पहिल्या चित्रपटादरम्यानच सुचली. तो म्हणाला, ‘आम्ही रेड चित्रपटावर काम करत असताना, कुमार मंगत यांनी त्याच्या सिक्वेलसाठी आधीच एक संकल्पना मांडली होती. आता आम्ही रेड २ बनवत आहोत, तेव्हा त्याने पुढाकार घेतला आहे आणि रेड ३ ची कहाणी सांगितली आहे.’
कुमार मंगत यांनी चित्रपटाबद्दल केला खुलासा
तसेच कुमार मंगत हे आत्मविश्वासाने म्हणाले, ‘रेड ३ नक्कीच येईल.’ अमेय पटनायकचा ‘रेड’ हा चित्रपट पुढेही सुरू राहील असे सांगून त्यांनी प्रेक्षकांचा उत्साह वाढवला आहे. संभाषणादरम्यान भूषण कुमार म्हणाले, ‘जेव्हा आम्ही रेडवर काम करायला सुरुवात केली तेव्हा स्क्रिप्टवर खूप आत्मविश्वास होता. कुमार मंगत सोबत काम करणे खूप छान होते. रेड हा चित्रपट सुपरहिट ठरला, तर रेड २ ला बनवण्यासाठी थोडा वेळ लागला.’ असे त्यांनी सांगितले.
दुसरा भाग ७ वर्षांनी होणार रिलीज
भूषण कुमार पुढे म्हणाले, ‘आम्ही आता पूर्णपणे तयार आहोत आणि रेड २ पाहिल्यानंतर प्रेक्षकांना काय प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी उत्सुक आहोत.’ ‘रेड’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता, जवळजवळ सात वर्षांनंतर, ‘रेड २’ प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. जो पाहण्यासाठी चाहते आता खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच २.८७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे, ज्याने अक्षय कुमारच्या ‘केसरी २’ या चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मागे टाकले आहे.