(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट पुष्पा २ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडाही उलटलेला नाही आणि या चित्रपटाने 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान, चित्रपटाचे निर्माते मोठ्या संकटात सापडले आहेत. राजपूत नेते राज शेखावत यांनी पुष्पा 2 च्या निर्मात्यांना धमकी दिली असून, त्यांनी चित्रपटात क्षत्रिय समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच शेखावत यांनी तो संवाद चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी निर्मात्यांना केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
निर्मात्यांना राजपूत नेते यांनी धमकावले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजपूत नेते राज शेखावत यांनी रविवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी निर्मात्यांना धमकी दिली आणि आरोप केला की चित्रपटात ‘क्षत्रिय’ समाजाबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली आहे. त्यांनी X वर लिहिले की, ‘पुष्पा 2 मधील शेखावतचे पात्र नकारात्मक आहे. क्षत्रियांचा पुन्हा अपमान होणार, करणी सेना सज्ज रहा.’ असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना लवकरच फटका बसणार आहे.
पुष्पा 2 फ़िल्म मे “शेखावत” का नेगेटिव किरदार, फिर से क्षत्रियों का अपमान, तैयार रहे करणी सैनिक, जल्द फ़िल्म निर्माता की ठुकाई की जाएगी। @aajtak @ABPNews @ZeeNews @VtvGujarati @BBCBreaking @CNNnews18 @timesofindia @TimesNow @htTweets @EconomicTimes @FinancialTimes @JagranNews… pic.twitter.com/vsbm2r3OLL
— Dr. Raj Shekhawat (@IAMRAJSHEKHAWAT) December 8, 2024
क्षत्रिय समाजाचा अपमान
नेते राज शेखावत यांनी पुष्पा 2 च्या निर्मात्यांवर आरोप केले आणि पुढे म्हणाले की चित्रपटात शेखावत शब्दाचा वारंवार ‘अपमान’ केल्याने क्षत्रिय समाजाचा अपमान झाला आहे. यासोबतच त्यांनी निर्मात्यांना चित्रपटातून हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली आहे.
निर्मात्यांनी प्रतिसाद दिला नाही
राजपूत नेते पुढे म्हणाले की, ‘पुष्पा 2′ ने अनेकवेळा क्षत्रियांचा अपमान केला आहे. चित्रपटात शेखावत समाजाचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली क्षत्रियांचा अवमान करण्याचा हा उद्योग आहे. पुन्हा एकदा त्यांनी तेच केले आहे.’ राजपूत नेते राज शेखावत यांच्या या धमकीवर अद्यापपर्यंत पुष्पा 2 च्या निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या बातमीने चाहत्यांना चकित केले आहे.
कॉमेडियन सुनील पालचे अपहरणकर्ते कॅमेऱ्यात कैद, मेरठमध्ये खंडणीच्या पैशातून सोने खरेदी!
फहद फाजीलने ही भूमिका साकारली होती
उल्लेखनीय आहे की 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटात एसपी भंवर सिंह शेखावत यांची भूमिका अभिनेता फहद फाजिलने साकारली आहे. तो पुष्पा २ चा देखील एक भाग आहे. चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा नकारात्मक आहे. त्यांची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. याशिवाय रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा श्रीवल्लीची भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. हा चित्रपट सिनेमागृहात जबरदस्त कमाई करताना दिसत आहे.