(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
काल बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांच्याबद्दल बातमी आली होती की त्यांना अचानक मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बातमीने चाहत्यांना तणावात टाकले होते. नंतर, राकेश रोशन यांची मुलगी सुनैना रोशनने तिच्या वडिलांच्या आरोग्याची माहिती दिली आणि सांगितले की त्यांना अँजिओप्लास्टीमुळे दाखल करण्यात आले आहे. राकेश रोशन यांची प्रकृती आता कशी आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2’ मध्ये दिसणार ‘तुलसी’ चे नवे रूप, एकता कपूरने दिली माहिती
राकेश रोशन यांची प्रकृतीची माहिती
माध्यमांच्या वृत्तानुसार, १६ जुलै रोजी राकेश रोशन यांची प्रकृती अचानक बिघडली. यामुळे त्यांना अचानक मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये हलवले. आता अपडेट अशी आहे की राकेश रोशन यांची प्रकृती सुधारली आहे आणि ते हळूहळू बरे होत आहेत. हे माहिती समोर येताच चाहत्यांची चिंता मिटली आहे.
सुनैना रोशन काय म्हणाली?
दुसरीकडे, राकेश रोशन यांची मुलगी सुनैना रोशनने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या वडिलांना आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. सुनैना म्हणाली, ‘पप्पांची अँजिओप्लास्टी झाली आहे. आता ते बरे होत आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही.’ सुनैना यांनी असेही सांगितले की, राकेश रोशन डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि विश्रांती घेत आहेत. अभिनेते आता बरे होत आहेत.
Saiyaara Review : प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली चित्रपटाची कहाणी, म्हणाले ‘मोहित सुरीचा तगडा कमबॅक’
हृतिक रोशन त्याच्या वडिलांची काळजी घेत आहे
तसेच, हृतिक रोशन त्याची प्रेयसी सबा आझाद आणि बहीण सुनैना रोशनसह त्याचे वडील राकेश रोशन यांच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेत आहे. दुसरीकडे, तो त्याच्या आगामी ‘वॉर २’ चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. ‘वॉर २’ पुढील महिन्यात १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.