
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कोण आहेत Diego Borella? ज्यांचा शूटिंग दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
या मोठ्या आलिशान बंगल्याची खासियत म्हणजे त्यातील साधेपणा आणि आधुनिक सौंदर्य या घरात पाहायला मिळत आहे. प्रत्येक मजल्यावरून हिरवाईने नटलेली बाल्कनी दिसते आहे. उंच छताची लिव्हिंग रूम, भव्य झुंबर आणि मोठ्या खिडक्या घराला आलिशान लूक देत आहेत. विशेष म्हणजे हा बंगला कृष्णा राज कपूर यांच्या नावावर आहे आणि आता तो रणबीर-आलियाची मुलगी रिया कपूरसाठी खास गिफ्ट म्हणून नोंदवला जाणार आहे. म्हणजेच हे घर पुढच्या पिढीच्या नावावर असणार आहे. मीडियाने अनेकदा रणबीर, आलिया आणि नीतू कपूर यांना या घराच्या साइटवर भेट देताना पाहिले आहे. त्यांनी बांधकामाची एक-एक डिटेल स्वतः तपासून पहिली आहे. एका सूत्राच्या म्हणण्यानुसार, घराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आणि पुढच्या महिन्यात ते घरात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
या चित्रपटांमध्ये आलिया भट्ट-रणबीर कपूर दिसणार एकत्र
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच विकी कौशलसोबत संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. याशिवाय आलिया भट्ट ‘अल्फा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणार आहे. त्याचबरोबर ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा हा बंगला पाहून चाहते खूप खुश आहेत.